CWG 2022: भारताला मोठा झटका, Neeraj Chopra कॉमनवेल्थ गेम्स मधून बाहेर

कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भालाफेकीत भारताचे पदकाचे प्रमुख आशास्थान असलेला नीरज चोप्रा कॉमनवेल्थ गेम्सला मुकणार आहे.

CWG 2022: भारताला मोठा झटका, Neeraj Chopra कॉमनवेल्थ गेम्स मधून बाहेर
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 1:14 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG) स्पर्धा सुरु होण्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. भालाफेकीत भारताचे पदकाचे प्रमुख आशास्थान असलेला नीरज चोप्रा (Neeraj Chopra) कॉमनवेल्थ गेम्सला मुकणार आहे. त्याला एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धे दरम्यान दुखापत झाली होती. वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप (World Championship) स्पर्धेत त्याने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. सिलव्हर मेडल जिंकून त्याने इतिहास रचला होता. त्याने 88.13 मीटर अंतरावर थ्रो केला होता. नीरज चोप्राच्या पायला दुखापत झाली होती. चौथ्या थ्रो दरम्यान नीरजचा दुखापतीची जाणीव झाली होती. आता ही दुखापत इतकी मोठी झालीय की, तो कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खेळू शकणार नाहीय. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरजची नजर कॉमनवेल्थ मधल्या सुवर्णपदकावर होती. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर त्याने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याचा इरादा जाहीर केला होता.

7 ऑगस्टला पीटर्स आणि नीरज येणार होते आमने-सामने

भारतीय चाहते 7 ऑगस्टची आतुरतेने वाट पाहत होते. कारण या दिवशी नीरज आणि वर्ल्ड चॅम्पियन पीटर्स आमने-सामने येणार होते. पीटर्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये नीरजचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न मोडलं होतं. पीटर्सने पहिल्या तीन थ्रो मध्येच 90 मीटर पेक्षा जास्त अंतरावर भालाफेक केली होती. कॉमनवेल्थ गेम्स मधून बाहेर झाल्यामुळे नीरजला त्याचा किताबही टिकवता येणार नाहीय. त्याने 2018 कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती.

महीना भर सक्तीची विश्रांती

वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर नीरजचं एमआरआय स्कॅन झालं. त्यात त्याला ग्रोइन इंजरी झाल्याच निष्पन्न झालं. नीरजला महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये नीरज चोप्राने कसं मिळवलं रौप्यपदक ?

  1. त्याचा पहिला थ्रो नो-थ्रो ठरला, फाऊल थ्रो होता.
  2. दुसरा थ्रो 82.39 मीटर अंतरापर्यंत गेला
  3. तिसऱ्या थ्रो मध्ये नीरजने कमबॅक केलं. 86.37 मीटर अंतरापर्यंतच्या या थ्रो ने त्याला चौथी पोझिशन मिळवून दिली.
  4. त्यानंतर त्याने चौथ्या थ्रो मध्ये 88.13 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्यामुळे त्याला रौप्यपदक निश्चित झाले.
  5. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स सुवर्णपदकासाठी प्रमुख दावेदार होता. त्याने पहिल्याच थ्रो मध्ये 90 मीटरच अंतर पार केलं. 90.21 मीटर
  6. अंतरापर्यंत भाला फेकला. दुसऱ्याप्रयत्नात त्यापुढे 90.46 मीटर अंतर गाठलं. अंतिम थ्रो 90.54 मीटरवर करत सुवर्णपदक निश्चित केलं.

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.