CWG 2022: विजयानंतर PV Sindhu रडली, 8 वर्षांच दु:ख अश्रूंवाटे बाहेर आलं, पहा VIDEO

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं. तिने आज झालेल्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या (Canada) मिशेल ली वर सरळ दोन गेम मध्ये विजय मिळवला.

CWG 2022: विजयानंतर PV Sindhu रडली, 8 वर्षांच दु:ख अश्रूंवाटे बाहेर आलं, पहा VIDEO
pv sindhu
Image Credit source: twitter
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Aug 08, 2022 | 3:50 PM

मुंबई: भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने (PV Sindhu) कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) मध्ये अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं. तिने आज झालेल्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या (Canada) मिशेल ली वर सरळ दोन गेम मध्ये विजय मिळवला. या विजयासह तिने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. कॅनडाच्या मिशेल ली वर तिने 21-15, 21-13 असा सरळ गेम मध्ये विजय मिळवला. या विजयानंतर सिंधू भावूक झाली होती. जिंकल्यानंतर सिंधूने आपल्या हाताने चेहरा झाकला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानंतर तिने स्वत:ला सावरलं. कोचची गळाभेट घेतली.

अखेर सिंधुने गोल्ड मेडल मिळवलं

पी.व्ही.सिंधुसाठी हा विजय खास आहे. कारण कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये तिने पहिल्यांदा गोल्ड मेडल विजेती कामगिरी केली आहे. पी.व्ही. सिंधुची 2014 आणि 2018 मध्ये गोल्ड मेडल जिंकण्याची संधी हुकली होती. 2014 मध्ये तिला ब्राँझ मेडलवर समाधान मानाव लागलं होतं. 2018 मध्ये तिने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. आपल्या तिसऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सिंधु सुवर्णपदक विजेती कामगिरी करण्यात यशस्वी ठरली.

सिंधु भारताची सर्वात मोठी बॅडमिंटनपटू

पी.व्ही. सिंधु भारताची सर्वात मोठी बॅडमिंटनपटू आहे. तिने ऑलिम्पिक मध्ये रौप्य आणि ब्राँझ अशी दोन मेडल्स मिळवली आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तिने पाच मेडल्स मिळवली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं आहेत. आशियाई स्पर्धेतही तिच्या नावावर एक रौप्यपदक आहे. आता कॉमनवेल्थ मध्ये तिने सुवर्णपदक विजेती कामगिरी केलीय.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें