
मेलबर्न : आर्यलॅंड (IRE) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात आज महामुकाबला सुरु आहे. न्यूझिलंडच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे न्यूझिलंड टीमची धावसंख्या 185 झाली आहे. विशेष म्हणजे सुरु असलेल्या मॅचमध्ये प्रेक्षकांना दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या. एक म्हणजे आजच्या मॅचमध्ये केन विल्यमसनचं (Kane Williamson) शानदार अर्धशतक झालं. तर दुसरं म्हणजे जोश लिटलची (Joshua Little) हॅटट्रिक पाहायला मिळाली.
जोश लिटल याने आजच्या मॅचमध्ये भेदक गोलंदाजी केली आहे. 4 ओव्हरमध्ये त्याने 22 धावा केल्या. जोश लिटल याचा हॅटट्रीक केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
आर्यलॅंडच्या फलंदाजांनी सुद्धा चांगली सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या सहा ओव्हर त्यांची धावसंख्या 50 झाल्या आहेत. अद्याप एकही विकेट पडलेली नाही.
That T20 World Cup hat-trick feeling ?#IREvNZ #T20WorldCup #BackingGreen ☘️? #T20WorldCup #T20WorldCup2022 #T20worldcup22 #jotlitle pic.twitter.com/riZ9gykFXe
— महेश घोलप mahesh gholap (@maheshgholap3) November 4, 2022
न्यूझीलंड
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
आर्यलॅंड
पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (क), लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्पर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क अडायर, फिओन हँड, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल