चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर 5 हजार कोटींचा सट्टा; सट्टेबाजांची फेवरेट टीम कोणती, भारत की न्यूझीलंड?

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. यामागे एक मोठं इंटरनॅशनल रॅकट आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर 5 हजार कोटींचा सट्टा; सट्टेबाजांची फेवरेट टीम कोणती, भारत की न्यूझीलंड?
Image Credit source: blackaps and kuldeep Yadav icc x account
| Updated on: Mar 08, 2025 | 6:01 PM

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर तब्बल 5 हजार कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. यामागे एक मोठं इंटरनॅशनल रॅकट असून, भारतीय संघ हा सट्टेबाजांचा फेवरेट संघ आहे. अंडरवर्ल्डपासून ते जगभरातील सट्टेबाजांचं लक्ष सध्या या सामन्याकडे आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत.चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल महामुकाबला भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या दुबईत होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, साखळी सामन्यामध्ये भारतानं बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा पराभव केला. तर उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियानं मोठ्या थाटात फायनल गाठली, तर दुसरीकडे न्यूझीलंडनी उपांत्यफेरीत साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. आता उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये न्यूझीलंड आणि टीम इंडियामध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

मात्र दुसरीकडे या हायहोल्टेज सामन्यामुळे आता सट्टाबाजार देखील तेजीत आला आहे. जगभरातील प्रमुख बुकी दुबईमध्ये आले आहेत. दिल्लीसह भारतातील सर्व प्रमुख बुकी दुबईमध्ये बसून क्रिकेटवर सट्टा लावतात अशी माहिती देखील समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्ऱॉफीचे सामने सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत दिल्लीमधून पाच मोठ्या बुकींना अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांकडून नुकतचं भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या उपांत्य सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन बड्या बुकींना दिल्लीमधून अटक करण्यात आलं आहे.तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सट्टेबाजाराचं दुबई कनेक्शन देखील समोर आलं आहे. योगेश कुकेजा वय 31 वर्ष आणि सुरज वय 24 अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून तब्बल 22 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

भारताचं पारडं जड 

दरम्यान उद्या होणाऱ्या महामुकाबल्यामध्ये भारताचं पारडं जड मानलं जात आहे, कारण या स्पर्धेत भारतानं अजून एकही सामना गमावलेला नाही, तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र भारताकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे या महामुकाबल्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.