IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक
India vs Pakistan | क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार जाणून घ्या.

मुंबई | वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरीतील नववी आणि अखेरची फेरी सुरु आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. तर सेमी फायनलच्या चौथ्या जागेसाठी न्यूझीलंड 99 टक्के निश्चित आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान टीमला संधी आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानला इंग्लंड विरुद्धचा सामना विक्रमी फरकाने जिंकावा लागणार आहे. पाकिस्ताननेही अशक्य कामगिरी केली तर सेमी फायनलमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान असा सामना होईल. मात्र आकड्यांच्या हिशोबाने अशक्य आहे. चौथ्या जागेसाठी हा कुटाणा सुरु असताना दुसऱ्या बाजूला एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबला होणार आहे. आशियाई क्रिकेट काऊन्सिलने अंडर 19 आशिया कप 2023 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहे. हा सामना कधी होणार, या स्पर्धेत एकूण किती सामने होणार, स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं आहे, किती संघ सहभागी होणार, याबाबतची सर्व सविस्त माहिती आपण जाणून घेऊयात. एसीसीने बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी अंडर 19 मेन्स आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. एसीसीने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली.
15 सामने 3 स्टेडियम
या स्पर्धेत आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 8 ते 17 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे.साखळी फेरीतील सामने 8 ते 13 डिसेंबरदरम्यान होतील. त्यानंतर 15 डिसेंबरला सेमी फायनल आणि 17 ला अंतिम सामना पार पडेल. स्पर्धेतील एकूण 15 सामन्यांचं आयोजन हे 3 स्टेडियममध्ये करण्यात आलंय. साखळी फेरीतील सर्व सामने हे आयसीसी एकेडमी ओव्हर 1 आणि 2 मैदानात आयोजित करण्यात आले आहेत. तर सेमी फायनल आणि फायनलचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलंय.
8 टीम 2 ग्रुप
अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 2 ग्रुपमध्ये प्रत्येकी 4-4 हिशोबाने विभागण्यात आलं आहे. गतविजेता टीम इंडिया, पाकिस्तान नेपाळ आणि अफगाणिस्तान हे 4 संघ ग्रुप एमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये जपान, यूएई, बांगलादेश आणि श्रीलंकेचा समावेश आहे. नेपाळ, जपान आणि यूएईचा रँकिगमध्ये टॉप 3 मध्ये असल्याने समावेश करण्यात आला आहे.
पहिला सामना केव्हा?
दररोज प्रत्येकी 2 सामने होतील. स्पर्धेतील पहिला सामना हा टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यांना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तसेच टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामना हा रविवारी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना आयसीसी एकॅडेमी ओव्हल 1 इथे आयोजित करण्यात आला आहे.
