IND vs PAK : पाकिस्तानला मिळाला ‘मौका’, भारताचा 8 गडी राखून पराभव

एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी फेल गेली. वैभव सूर्यवंशी एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली.

IND vs PAK :  पाकिस्तानला मिळाला मौका, भारताचा 8 गडी राखून पराभव
Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Nov 16, 2025 | 11:07 PM

एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी फेल गेली. वैभव सूर्यवंशी एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली. नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला पहिली फलंदाजी आहे. भारताने 19 षटकात सर्व गडी गमवून 136 धावा केल्या आणि विजयासाठी 137 धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं आव्हान 8 गडी राखून पूर्ण केलं. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या माझ सदाकत आणि मोहम्मद नईम यांनी आश्वासक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. यानंतर यश ठाकुरच्या गोलंदाजी मोहम्मद नईम 14 धावा करून बाद झाला. माझ सदाकतने आक्रमक खेळी भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. त्याने 31 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. सुयश शर्माने भारताला दुसरं यश मिळवून दिलं. पण तिथपर्यंत सामना हातून निसटला होता. माझ सदाकत एका बाजूने आक्रमक खेळी करतच होता. त्याने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

भारताकडून डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्यने केली. पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर प्रियांश आर्य 10 धावा करून बाद झाला. नमन धीर फलंदाजीला आला आणि 35 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा होत्या. पण 28 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 45 धावा बाद करून बाद झाला. या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. जितेश शर्मा 5, नेहल वढेरा 8, आशुतोष शर्मा 0, रमनदीप सिंग 11, हर्ष दुबे 19, यश ठाकुर 2, सुयश शर्मा 0 धावांवर बाद झाले. पाकिस्तानकडून शाहीद अजिझ 3, शाद मसूद 2, माझ सदाकत 2, उबैद शाह 1, अहमद डॅनियल 1 आणि सुफियन मुकीमने 1 विकेट घेतली.

भारताचा पुढचा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. कारण ओमान आणि भारताने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. उपांत्य फेरीसाठी हा सामना जिंकणं भाग आहे. तर पाकिस्तानने भारताला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर युएईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना युएईसोबत होणार आहे.