IPL Auction 2024 हार्दिक पंड्या मुंबईत गेल्यावर गुजरातचा खिसा गरम, लिलावाआधी पाहा कोणाकडे सर्वाधिक पैसे?

Most Money For The IPL Auction 2024 : मुंबईने हार्दिकला संघात घेत मोठी चाल खेळली, या ट्रे़डिंग विन्डोमुळे बरीचशी उलथापालथ झाली आहे. हार्दिकच्या मुंबईत जाण्याने गुजरात संघाचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. पाहा कोणत्या संघाकडे एकूण किती पैसे आहेत.

IPL Auction 2024 हार्दिक पंड्या मुंबईत गेल्यावर गुजरातचा खिसा गरम, लिलावाआधी पाहा कोणाकडे सर्वाधिक पैसे?
| Updated on: Nov 28, 2023 | 12:21 AM

मुंबई : आयपीएल 2024 लिलावाआधी मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकला, गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. गुजरात संघाचा कर्णधार आपल्याकडे घेण्यासाठी मुंबईने कॅमेरून ग्रीन याला आरसीबीला दिलं. यामुळे मुंबईला डबल फायदा झाला, हार्दिक पंड्यासारखा मोठा खेळाडू संघात परतला त्यासोबतच ग्रीनला देत आपल्याकडे लिलावासाठी पर्समध्ये आणखी 2.25 कोटी जमवले. हार्दिकच्या जाण्याने गुजरात संघाला धक्का बसला मात्र त्यांचा खिसाही आता चांगलाच गरम झाला आहे.

आता जर लिलावामध्ये सर्वाधिस पैसे असतील तर ते गुजरात  टायटन्स संघाकडे आहेत. तर आरसीबीने ग्रीनला घेतल्यामुळे त्यांची पर्स खाली झाली आहे. कारण ग्रीनला मुंबईने 17 कोटी 50 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. ती रक्कम त्यांना मुंबईला द्यावी लागली आहे.

आयपीएलमधील कोणत्या संघाकडे किती पैसे?

आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. हार्दिकच्या जाण्याने त्यांना 15 कोटी मिळाले आहेत. गुजरात संघाकडे एकूण 38.15 कोटी रूपये आहेत. दुसऱ्या स्थानी हैदराबाद संघ असून त्यांच्याकडे 34 कोटी आहे. तिसऱ्या स्थानी केकेआर असून त्यांच्याकडे 32.7 कोटी, चौथ्या स्थानी सीएसके असून त्यांच्याकडे 31.4 कोटी, पाचव्या स्थानी पंजाब संघ असून 29.1 कोटी आहेत.

सहाव्या क्रमांकावर आरसीबी असून त्यांच्याकडे आता 23.25 कोटी, सातव्य स्थानी दिल्ली कॅपिटल्स 28.95 कोटी, आठव्या स्थानी मु्ंबई इंडियन्स असून 17.75 कोटी तर नऊव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स असून त्यांच्याकडे 14.5 कोटी तर दहाव्या स्थानी लखनऊ सुपर किंग्ज संघ असून त्यांच्याकडे 13.15 कोटी बाकी आहेत.

 

दरम्यान, आयपीएलच्या लिलावामध्ये आता सर्व संघांच्या टीम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान असणार आहे. खास करून कोलाकाता आणि आरसीबी यांनी मुख्य गोलंदाजांना रिलीज केलं आहे. त्यामुळे गोलंदाजी मजबूत करायची असेल तर आताच सर्व गणित आकड्यांमध्ये जुळवायला हवीत.