‘पुढचे 6 महिने माझ्यासाठी तू….’ शमीला प्रपोज करणाऱ्या पायलने नव्या पोस्टमध्ये काय म्हटलय?

Mohammed Shami | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचा वर्ल्ड कप गाजवला. त्याने कमालीच प्रदर्शन केलं. शमीचा हा खेळ पाहून एक तरुणी प्रभावित झाली. तिने थेट मोहम्मद शमीला लग्नाची मागणी घातली. आता तिने X वर नवीन मेसेज पोस्ट केलाय. त्याचा अर्थ शमीशी जोडला जातोय.

'पुढचे 6 महिने माझ्यासाठी तू....' शमीला प्रपोज करणाऱ्या पायलने नव्या पोस्टमध्ये काय म्हटलय?
Actress Payal Ghoshs-Mohammed Shami
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 11:29 AM

IND vs AUS Final | भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा सुरु असताना अचानक पायल घोष हे नाव चर्चेत आलं होतं. कारण तिने कामच तसं केलं होतं. एकाबाजूला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सरस कामगिरी करत होता. मैदानावर शमीने आपल्या कामगिरीने सगळ्यांच मन जिंकून घेतलं. त्यात पायल घोष सुद्धा होती. पहिल्या पत्नीपासून विभक्त झालेल्या मोहम्मद शमीला पायल घोषने थेट लग्नाचीच मागणी घातली. X वर तिने मेसेज पोस्ट केला होता. ‘शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे’. सोबत तिने दोन हसण्याचे इमोजी पोस्ट केले होते. आता वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर पायल घोष त्यावर रिएक्ट झाली आहे. तिने X वर पूर्वीच्या टि्वटरवर एक उपरोधिक मेसेज पोस्ट केलाय.

‘पुढचे 6 महिने माझ्यासाठी क्रिकेट खेळू नकोस’ #INDvAUS #CWC23 असं पायल घोषने X वर लिहिलय. नेटीझन्स याचा संबंध थेट मोहम्मद शमीशी जोडतायत. तिने काही दिवसांपूर्वी असाच उपरोधिक मेसेज X वर पोस्ट केला होता. ‘दिल डूबा तेरे प्यार में’ त्याचाही संबंध शमीशी जोडण्यात आला होता. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यात मोहम्मद शमीने 7 विकेट घेतले. त्यावेळी सुद्धा पायल घोषने अनेक मेसेज पोस्ट केले होते. ‘शमी यू ब्युटी’, वैगेरे लिहिलं होतं. पायल घोष आता अभिनयाकडून राजकारणाकडे वळली आहे.

शमीने वर्ल्ड कपच्या 7 सामन्यात किती विकेट घेतलेत?

वनडे वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच विजयी अभियान फायनलमध्ये थांबलं. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता. पण अखेरच्या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 विकेट आणि 42 चेंडू राखून विजय मिळवला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य आरामात पार केलं. त्यांनी सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला, तर भारताच तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. मोहम्मद शमी वर्ल्ड कप 2023 मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 7 सामन्यात 24 विकेट घेतलेत.

Non Stop LIVE Update
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य.
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका.
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?.
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.