
ICC T20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूंवर त्यांच्याच देशातून टीका होत आहे. असं असताना आता खेळाडूंना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना खराब कामगिरीमुळे शिक्षा होणार आहे. पाकिस्तानात परतल्यानंतर पीसीबी काही खेळाडूंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ज्यामध्ये कर्णधार बाबर आझम आणि स्टार खेळाडू मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचाही समावेश आहे. पाकिस्तान संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर झाला आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे की, पाकिस्तान संघाला सुपर ८ मध्ये पोहोचला आलेलं नाही. त्यामुळे आता पाकिस्तानच्या खेळाडूंना याची किंमत मोजावी लागणार आहे. शुक्रवारी आयर्लंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अमेरिका सुपर-8 मध्ये पोहोचला आहे.
पाकिस्तानच्या अधिकारी आणि माजी खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना खेळाडूंचे पुनर्मूल्यांकन करण्याचा सल्ला दिलाय. पूर्वीचे अध्यक्ष झका अश्रफ यांच्या कार्यकाळात करार झाले होते.
मीडिया रिपोर्ट्नुसार, तर कराराचे पुनर्मूल्यांकन केले गेले आणि अध्यक्षांनी संघाच्या अलीकडील खराब कामगिरीवर तीव्र कारवाई केली तर खेळाडूंचे पगार आणि शुल्क कमी केले जाऊ शकतात. टी-20 विश्वचषकाच्या 9व्या आवृत्तीसह ही तिसरी वेळ आहे की पाकिस्तान संघ स्टेज सामन्यांच्या पुढे जाऊ शकला नाही.
युनूस खानच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाने 2009 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर शोएब मलिक (2007) आणि बाबर आझम (2022) यांच्या नेतृत्वात अंतिम फेरीत पोहोचला होता 2010, 2012 आणि 2021 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती.
2024 च्या विश्वचषकात अ गटातील पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अमेरिकेकडून पराभव झाला. तर भारताविरुद्ध देखील पाकिस्तानचा संघ पराभूत झाला. या सामन्यात तर भारतीय गोलंदाजांनी विजय पाकिस्तानच्या तोंडातून घास काढल्यासारखा खेचून आणला. पाकिस्तानी संघ १२० धावा ही करु शकला नाही.
बाबर आझमच्या नेतृत्वात गेल्या वर्षी पाकिस्तान संघाने आशिया चषक आणि विश्वचषक दोघांमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. T20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर न्यूझीलंड ब संघाविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधावी लागली होती आणि आयर्लंडविरुद्ध एक T20I सामनाही गमावला होता.