AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : KKR टीमसाठी मोठी Good News, घातक बॅट्समनची टीममध्ये एंट्री

Kolkata Knight Riders IPL 2023 : IPL 2023 मध्ये KKR टीमची ताकत आणखी वाढेल. T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली होती. हा घातक बॅट्समन आता केकेआर टीमकडून खेळणार आहे.

IPL 2023 : KKR टीमसाठी मोठी Good News, घातक बॅट्समनची टीममध्ये एंट्री
Image Credit source: KKR Twitter
| Updated on: Apr 10, 2023 | 3:39 PM
Share

Kolkata Knight Riders IPL 2023 : आयपीएल 2023 चा 13 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स टीममध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये रिंकू सिंहच्या ऐतिहासिक इनिंगच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला. या दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक मोठा बॅट्समन आयपीएल 2023 दरम्यान कोलकाता टीममध्ये दाखल झालाय. हा खेळाडू क्रिकेट विश्वात आपल्या स्फोटक बॅटिंगसाठी ओळखला जातो.

बांग्लादेशचा स्फोटक फलंदाज लिटन दास आयपीएल 2023 दरम्यान कोलकाता नाइट रायडर्स टीममध्ये दाखल झालाय. लिटन दास बांग्लादेशसाठी खेळत होता. त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाइट रायडर्स टीमचा भाग नव्हता. कोलकाता नाइट रायडर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना लिटन दास भारतात दाखल झाल्याची माहिती दिली.

भारताविरुद्ध आक्रमक बॅटिंग

आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन कोचीमध्ये झालं. त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्सने लिटन दासला 50 लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. पहिल्या फेजमध्ये लिटन दास अनसोल्ड होता. पण दुसऱ्या राऊंडमध्ये केकेआरने त्याला विकत घेतलं. लिटन दासकडे टी 20 फॉर्मेटचा अनुभव आहे. तो आक्रमक बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताविरुद्ध त्याने आक्रमक बॅटिंग केली होती.

टी20 क्रिकेटमध्ये शानदार आकडे

28 वर्षांचा लिटन दास आतापर्यंत एकूण 71 टी 20 इंटरनॅशनल सामने खेळलाय. या मॅचेसमध्ये त्याने 23.43 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 132.43 चा आहे. लिटन दासचे टी 20 मध्ये 10 हाफ सेंच्युरी आहेत. KKR ची टीम

नीतीश राणा (कॅप्टन), जेसन रॉय, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, टिम साउदी, उमेश यादव, अनुकूल रॉय, शार्दुल ठाकुर, लॉकी फर्ग्यूसन, रहमानुल्लाह गुरबाज, हर्षित राणा, लिटन दास, कुलवंत खेजोरोलिया, सुयश शर्मा, नारायण जगदीशन, वैभव अरोड़ा, डेविड वीजे, मनदीप सिंह.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?