टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर संजू सॅमसनने केला मोठा खुलासा, सचिन तेंडुलकरने कशी मदत केली? ते सांगितलं

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसन ट्रम्प कार्ड ठरला आहे. सुरूवातीच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये जागाही मिळाली नाही. पण नंतर त्याच्यामुळेच विजयाची चव चाखता आली. इतकंच काय तर पाच सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर प्लेयर ऑफ द सिरीजचा मान मिळवला. पण हे काही सोपं नव्हतं, दरम्यान काय झालं ते संजू सॅमसनने सांगितलं.

टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर संजू सॅमसनने केला मोठा खुलासा, सचिन तेंडुलकरने कशी मदत केली? ते सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर संजू सॅमसनने केला मोठा खुलासा, सचिन तेंडुलकरने कशी मदत केली? ते सांगितलं
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2026 | 12:42 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनने फॉर्म गमावला आणि त्याची प्लेइंग 11 मधील जागा अडचणीत आली. पहिल्या सामन्यात त्याचा विचारही केला गेला नाही. दुसऱ्या सामन्यात नामिबिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. अभिषेक शर्मा आजारी असल्याने त्याला संधी मिळाली. पण काही खास करू शकला नाही. पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धचा सामनाही त्याने बेंचवर बसून पाहिला. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातही त्याला डावलण्यात आलं. पण या सामन्यातील पराभवामुळे त्याची संघात जागा झाली. कारण येथून पुढे करो या मरोचे सामने होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली. या सामन्यात त्याने 15 चेंडूत 24 धावांची खेळी केली आणि बाद झाला.पण संघाला चांगली सुरूवात करून देण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही संधी मिळाली. यानंतर त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला. पण हा बदल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरमुळे झाल्याची जाहीर कबुली त्याने दिली.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसनने प्लेयर ऑफ द सीरिजचा मान मिळवल्यानंतर जाहीरपणे सांगितलं की, ‘काही माजी खेळाडूंनी माझ्याशी संपर्क साधला होता आणि माझी मदत करण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही महिन्यांपासून सचिन सर माझ्या संपर्कात होते. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि बऱ्याच संवाद झाला. इतक्या मोठ्या व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळालं, अजून काय हवं. मी खूप खूश आहे की मला सर्वांनी पाठिंबा दिला. हे माझ्यासाठी खूप आहे. मी हे इंजॉय करू इच्छित आहे.’

संजू सॅमसन या स्पर्धेतील 9 पैकी 5 सामन्यात खेळला. त्याने 80पेक्षा जास्तीच्या सरासरीने 321 धावा केल्या. यात संजू सॅमसनने 24 षटकार आणि 27 चौकार मारले. या स्पर्धेत संजू सॅमसन सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. तीन सामन्यात त्याने सलग अर्धशतकी खेळी केली. खरं तर शतकाच्या वेशीवर आला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97 धावांवर होता. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 89 आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 89 धावांवर बाद झाला.

Follow Us