Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेच करियर संपलं का? खूप वाईट, इंग्लंडमध्ये सुद्धा फेल
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे सध्या कुठे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अजिंक्य रहाणे टीम इंडियात पुनरागमनाचा सतत प्रयत्न करतोय. पण त्याची कामगिरी तशी होत नाहीय. आधी भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळला आता रहाणे इंग्लंडला गेला आहे.

अजिंक्य रहाणे दीर्घकाळ टीम इंडियाचा मजबूत कणा होता. खासकरुन परदेश दौऱ्यात अनेकदा तो टीम इंडियासाठी संकटमोचक बनला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात मिळालेला कसोटी मालिका विजय कोण विसरु शकतो?. रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दुसऱ्यांदा टेस्ट सीरीज 2-1 ने जिंकली. त्यानंतर तो दीर्घकाळ टीम इंडियात खेळू शकला नाही. टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे सध्या या फॉर्मेटमध्ये सुद्धा नाहीय. रहाणे सतत पुनरागमनाचा प्रयत्न करतोय. भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी रहाणे तिथे गेला. पण इंग्लंडच्या काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये डिविजन 2 च्या पहिल्या डावात हाती निराशाच लागली.
अजिंक्य रहाणे इंग्लंडच्या वनडे कपमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. तो लेस्टरशरकडून 10 सामने खेळला. यात त्याने शानदार प्रदर्शन केलं. या दरम्यान रहाणेने 42 च्या सरासरीने 378 धावा केल्या. लेस्टरशरचा तो तिसरा यशस्वी फलंदाज होता. टुर्नामेंटमध्ये त्याने चार अर्धशतक झळकावली. पण एकही शतक झळकावता आलं नाही. आता काऊंटी चॅम्पियशिपची सुरुवात झाली आहे. लेस्टशरचा सामना ग्लोसटरशर विरुद्ध सुरु आहे.
इंग्लंडमध्ये प्रदर्शन कसं?
ग्लोसटरशरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. लेस्टरशरच्या टीमने 77 रन्सवर दोन विकेट गमावले होते. त्यानंतर चौथ्या नंबरवर रहाणे फलंदाजीसाठी आला. पण तो स्वस्तात पॅवेलियनध्ये परतला. डोमिनिक गुडमॅनने ऑफ स्टम्प वर चेंडू टाकला. त्याच्या उसळीचा रहाणेला अंदाज लावता आला नाही. त्याने सोपी कॅच दिली. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कॅमरन बॅनक्रॉफ्ट झेप घेऊन शानदार कॅच घेतली. रहाणेने 28 चेंडूत फक्त 12 धावा केल्या.
टीम इंडियाकडून शेवटचा सामना कधी खेळला?
अजिंक्य रहाणे टीम इंडियाकडून कुठलाही सामना खेळून 1 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. त्याला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही टीम्स विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नव्हती. बीसीसीआयने मागच्या वर्षभरात युवा चेहऱ्यांना जास्त संधी दिली आहे. पुढच्या काही टेस्ट सीरीजमध्ये सुद्धा रहाणे टीम मॅनेजमेंटच्या प्लानचा भाग नसेल. 36 वर्षांचा रहाणे मागच्या काही काळात चांगलं प्रदर्शन करु शकलेला नाही.
View this post on Instagram
काऊंटीच्या पहिल्या डावात फेल होण्याआधी त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध अवघे 8 रन्स केले होते. देशांतर्गत टुर्नामेंटमध्ये सुद्धा रहाणेच प्रदर्शन खूप खराब होतं. 2023-24 च्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 8 सामन्यात त्याच्या बॅटमधून 12 च्या सरासरीने फक्त 141 धावा निघाल्या.
