AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराजने माझ्यावर राग काढला आणि…! अजिंक्य रहाणेने केली डीएसपीची पोलखोल

इंग्लंड कसोटी मालिका मोहम्मद सिराजसाठी खूपच चांगली गेली. त्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असताना अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेलवर मागच्या चार वर्षात सिराजने काय केलं याबाबत पाढा वाचला. सिराजने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातच पदार्पण केलं होतं.

मोहम्मद सिराजने माझ्यावर राग काढला आणि...! अजिंक्य रहाणेने केली डीएसपीची पोलखोल
मोहम्मद सिराजने माझ्यावर राग काढला आणि...! अजिंक्य रहाणेने केली डीएसपीची पोलखोल Image Credit source: PTI
| Updated on: Aug 08, 2025 | 10:15 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पाच सामन्यात मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. खासकरून जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत त्याने संघाला अपेक्षित गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याचा प्रभाव दिसून आला. शेवटच्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर दबाव असून त्याने भेदक गोलंदाजी केली. या मालिकेत त्याने 23 विकेट घेतल्या. असं असताना मोहम्मद सिराजला त्याच्या पहिल्या कसोटी कर्णधाराने सलाम ठोकला आहे. अजिंक्य राहणेच्या नेतृत्वातच मोहम्मद सिराजने पदार्पण केलं होतं. त्याने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळला होता. अजिंक्य रहाणेने मोहम्मद सिराजबाबत एक खुलासा केला आहे. त्याबाबत खूपच कमी लोकांना माहिती आहे. अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेवर त्याचं कौतुक करताना ही बाब सांगितली. त्याने सांगितलं की, मोहम्मद सिराजचा राग आणि आक्रमकता त्याच्या कामगिरीत सर्वोत्तम देते.

अजिंक्य रहाणेने मोहम्मद सिराजबाबत खुलासा केली की, पदार्पणाच्या मालिकेत सिराज नाराज झाला होता. रहाणेच्या कर्णधारपदाखाली खेळताना त्याला अडचणीचा सामंना करावा लागला होता. रहाणेने सांगितलं की, ‘मला सिराजची एक बाब खूपच आवडते. ती म्हणजे त्याचं दीर्घकाळ गोलंदाजी करणं. 2020-21 च्या मालिकेतही त्याने वेगाने गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलियात.. तेव्हा त्याने पदार्पण केलं होते. तेव्हा तो माझ्यावर नाराज होता. कारण मी त्याला गोलंदाजी देण्यासाठी उशीर केला होता.’ अजिंक्य रहाणेने पुढे सांगितलं की, ‘त्याच्या अंगात अजूनही तोच राग आहे. तो रागच त्याचं सर्वोत्तम कामगिरी घडवते. आम्ही इंग्लंड मालिकेत हे पाहीलं आहे. त्याच्या गोलंदाजीत आक्रमकता आणि ज्या वेगाने गोलंदाजी करतो, तो पहिल्या चेंडूपासून तयार असतो. एका महान गोलंदाजाचं लक्षण आहे.’

सिराजमध्ये हा बदल दिसला

अजिंक्य रहाणेने सिराजबाबत आणखी एक बाब अधोरेखित केली. सिराज क्षेत्ररक्षण लावण्यात पटाईत झाला आहे, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत त्याने चांगली गोलंदाजी केली. तसेच त्याने जबाबदारी घेतली. क्षेत्ररक्षण लावण्यात त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान, ओव्हल कसोटीत मोहम्मद सिराजने एकूण 9 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 4 आणि दुसर्‍या डावात 5 गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडिया ओव्हल कसोटी 6 धावांनी जिंकली. या विजयासह मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण