IPL 2022: Ajinkya Rahane साठी झटका, हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर, इतके महिने क्रिकेट नाही खेळता येणार

मागच्या आठवड्यात Ajinkya Rahane ने दुखापतीमुळे IPL 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

IPL 2022: Ajinkya Rahane साठी झटका, हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर, इतके महिने क्रिकेट नाही खेळता येणार
ajinkya rahane Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 4:57 PM

मुंबई: मागच्या आठवड्यात Ajinkya Rahane ने दुखापतीमुळे IPL 2022 च्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. ही दुखापत गंभीर आहे. त्यामुळे पुढचे दोन महिने त्याला क्रिकेट खेळता येणार नाहीय. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी (England Test Match) सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाच विचार होणार नाही. त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यताही तशी धुसरच होती. जून महिन्यात होणाऱ्या रणजी करंडकाच्या बाद फेरीच्या सामन्यातही तो खेळू शकणार नाही. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीला त्याच्याजागी नवीन खेळाडूची निवड करावी लागेल. स्कॅनमधून त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. अजिंक्य या आठवड्याच्या सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सच्या कॅम्पमधून बाहेर पडला. 14 मे रोजी पुण्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली होती.

या सीजनमध्ये रहाणेने किती धावा केल्या?

IPL 2022 च्या सीजनमध्ये अजिंक्य रहाणे विशेष काही करु शकला नाही. त्याने सात डावात फक्त 133 धावा केल्या. 19 च्या सरासरीने त्याने धावा केल्या. केकेआरने त्याला बेस प्राइसला म्हणजे फक्त 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून खराब फॉर्म

अजिंक्य रहाणे असाही फॉर्ममध्ये नव्हता. दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत खराब कामगिरीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून डच्चू मिळाला होता. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये त्याला प्रभावी कामगिरी करण्याची संधी होती. दिनेश कार्तिकने ज्या प्रमाणे निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधून घेतलं, तसाच चान्स अजिंक्य रहाणेकडेही होता. पण त्यात त्याला यश मिळालं नाही. दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होण्याआधीपासून अजिंक्य रहाणे सातत्याने खराब फॉर्मचा सामना करतोय.

केकेआर सहाव्या स्थानावर

यंदाच्या सीजनमध्ये केकेआरला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ते सहाव्या स्थानावर राहिले. प्लेऑफमध्ये त्यांना प्रवेश करता आला नाही. यंदाच्या सीजनमध्ये केकेआरचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे होतं. 12 कोटीपेक्षा पणा जास्त रक्कम मोजून फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं होतं.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.