WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ‘ते’ 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!

| Updated on: Jun 14, 2021 | 8:02 AM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी रहाणे म्हणाला, अलिकडच्या काळात भारतीय संघाने ज्या प्रकारचं सातत्य दाखवलं आहे ते पाहता डब्ल्यूटीसी फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया दावेदार आहे. (Ajinkya Rahane Statement On WTC Final India vs New Zealand)

WTC Final : न्यूझीलंडला कसं हरवणार?, अजिंक्य रहाणे म्हणतो, फक्त ते 2 शॉट खेळायचे आणि मैदान मारायचं!
Ajinkya Rahane
Follow us on

मुंबई : तो ऐतिहासिक दिवस आता फार दूर नाही, जेव्हा टीम इंडिया (Team India) कसोटी क्रिकेटमध्ये विश्वविजेता होईल की नाही याचा निर्णय होईल. तो दिवस लवकरच येतोय, जो दिवस कोणता संघ कसोटी क्रिकेटचा विश्वविजेता असेल हे सांगेल. कसोटी मालिकेत यजमान इंग्लंडलाच पराभूत करून न्यूझीलंडने आपला दिमाखदार खेळ दाखवलाय. परंतु, टीम इंडियाने डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी तयारीसाठी इंट्रा-स्क्वॉड सामने खेळले आहेत. खेळाडूच्या खेळण्याची शैली आणि अनुभव खूपच महत्त्वाचा असतो, त्या आधारे टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने इंग्लंडमधल्या परिस्थितीत मैदान कसं मारायचं आणि न्यूझीलंडला कसं लोळवायचं, याचा मंत्र सांगितलाय. (Ajinkya Rahane Statement On WTC Final India vs New Zealand)

फक्त हे दोन प्रकारचे शॉट्स खेळा

अजिंक्य रहाणेने इंग्लंडमधील यशाचा कानमंत्र सांगितला आहे. इंग्लंडमध्ये भारतीय फलंदाजांनी 2 प्रकारचे शॉट्स खेळणं महत्त्वाचं आहे. एक सरळ म्हणजे अगदी स्ट्रेट आणि दुसर म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढं शरीरापासून जवळ… अशा प्रकारे भारतीय फलंदाजांनी जर शॉट्स खेळले, तर इंग्लंडचं मैदान मारणं अवघड नसेन, असंच रहाणेनं सांगितलं आहे.

ज्याला चॅलेंज आवडतं, त्याला इंग्लंडमध्ये खेळणं सोपं

बीसीसीआय टीव्हीवर बोलताना रहाणे म्हणाला, “ज्या फलंदाजांना चॅलेंज आवडतं त्यांना इंग्लंडची परिस्थिती आवडते. आपण सेट झाल्यावर इंग्लंडमध्ये फलंदाजी करणं सोपं होऊन जातं. एक फलंदाज म्हणून, मला वाटते की तुम्ही इंग्लंडमध्ये जितके सरळ (स्ट्रेट) खेळाल आणि शरीराच्या जवळ खेळाल तितके चांगले आहे. फलंदाज म्हणून तुम्ही स्वत:ला कधीही सेट मानू शकत नाही. मग आपण फक्त 70 किंवा 80 धावा केल्यावर का असेना, कारण एक चांगला चेंडू तुमचं काम तमाम करु शकतो.

टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी रहाणे म्हणाला, अलिकडच्या काळात भारतीय संघाने ज्या प्रकारचं सातत्य दाखवलं आहे ते पाहता डब्ल्यूटीसी फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया दावेदार आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांत बरंच सातत्यपूर्ण क्रिकेट खेळलं आहे. याचा परिणाम असा आहे की आज आम्ही डब्ल्यूटीसी फायनलमध्ये आहोत. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामन्यात सर्वोत्कृष्ट असावं लागतं.

अंतिम सामन्याचं दडपण नाही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल टीम इंडियावर दबाव आहे का, असा प्रश्न विचारला असता रहाणे म्हणाला, विराट अँड कंपनी हा एक सामना म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. अर्थातच हा सामना महत्त्वाचा आहे. आम्ही सर्व खेळाडू एकत्रितपणे चांगला वेळ घालवत आहोत. आम्हावा फक्त डब्ल्यूटीसी फायनल खेळायचं आहे आणि त्यामध्ये आमचं सर्वोत्तम काम करायचं आहे. मग, निकाल काहीही असो…. अंतिम सामन्याचं आमच्यावर अजिबात दडपण नाही…!, असं रहाणे म्हणाला.

(Ajinkya Rahane Statement On WTC Final India vs New Zealand)

हे ही वाचा :

WTC Final : न्यूझीलंडने गावस्करांना तोंडावर पाडलं, भारतावर संकट, किवींच्या गोटात आनंद!

WTC Final पूर्वी न्यूझीलंडचं शक्तिप्रदर्शन, इंग्लंडवर 8 विकेट्सने मात करत मालिकाविजय

WTC Final पूर्वी भारतीय संघातील खेळाडूंमध्ये सराव सामना, ‘या’ खेळाडूने घेतले सर्वाधिक विकेट्स