IPL 2027 : हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडू असं का म्हणाला?

आयपीएल 2027 आधी हार्दिक पंड्याच्या संघबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. अशातच माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने हार्दिकच्या मुंबई इंडियन्समधील परिस्थितीवर भाष्य करत त्याला कर्णधारपदापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांचाही त्याने उल्लेख केला आहे.

IPL 2027 : हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडावे, अंबाती रायडू असं का म्हणाला?
Hardik Pandya IPL 2027
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 7:36 PM

आयपीएल 2027च्या आगामी लिलावापूर्वी भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या तुफान चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात हार्दिकच्या संभाव्य ‘ट्रेड’बाबत पडद्यामागे घडामोडी सुरू असल्याच्या बातम्यांनी क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. या सगळ्या राड्यात भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू याने हार्दिकला एक अतिशय महत्त्वाचा आणि परखड सल्ला दिला आहे. हार्दिकने आता कर्णधारपदाचे ओझे बाजूला ठेवून केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला रायडूने दिला आहे.

मुंबईत राहा किंवा पंजाबला जा, पण कॅप्टन्सी नको!

मुंबई आणि पंजाब यांच्यात हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्या अदलाबदलीची (ट्रेड) चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. पंजाब किंग्जकडे श्रेयस अय्यर हा आधीच कर्णधार म्हणून सिद्ध झालेला चेहरा असल्याने हार्दिक तिथे गेला तरी त्याला निव्वळ खेळाडू म्हणूनच खेळावे लागेल. यावर भाष्य करताना रायडू म्हणाला, मी हार्दिकच्या जागी असतो, तर अशा संघात जायचा विचार केला असता जिथे मला माझ्या खेळाचा मनमुराद आनंद घेता येईल. नव्या संघात जाऊन लगेच नेतृत्वाचा ताण घेण्यापेक्षा तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे गरजेचे आहे. हार्दिकने मुंबई इंडियन्समध्येच राहायचे ठरवले तरीही त्याने किमान एका हंगामासाठी कर्णधारपद सोडून द्यावे आणि फक्त सामने जिंकून देण्यावर भर द्यावा.

Loading...

मुंबईत हार्दिकला एका कोपऱ्यात ढकलल्यासारखं वाटलं

गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवून आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतलेल्या हार्दिकसाठी रोहित शर्माच्या जागी कर्णधार होण्याचा निर्णय फारसा सुखावणारा ठरला नाही. सलग दोन हंगाम मुंबईला प्लेऑफमध्येही पोहोचता आले नाही. रायडूच्या मते, मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये हार्दिकला अनेकदा एका कोपऱ्यात ढकलल्यासारखी भावना झाली असावी. जेव्हा एखाद्या खेळाडूला असे वाटते, तेव्हा त्याच्याकडून नकळत काही चुका घडतात. हार्दिकसाठी अनेक गोष्टी योग्य पद्धतीने घडल्या नाहीत, पण आता त्याने कर्णधारपदाची खुर्ची बाजूला ठेवून स्वतःमधील मूळ ऑलराउंडर जिवंत केला पाहिजे.

रिकी पॉन्टिंग ठरतील योग्य मार्गदर्शक

अंबाती रायडूच्या मते, पंजाब किंग्जमध्ये गेल्यास मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हार्दिक पुन्हा एकदा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये आणि चांगल्या मानसिक स्थितीत येऊ शकतो. यापूर्वीही हार्दिकने पॉन्टिंग यांच्यासोबत काम केले आहे.

दुखापतींचं सत्र अन् पुनरागमनाची वाट

मुंबईत परतल्यापासून 39 सामन्यांत 646 धावा आणि 29 विकेट्स घेणाऱ्या हार्दिकला दुखापतींनी चांगलेच घेरले आहे. पाठीच्या स्नायूंचा ताण, क्वाड्रिसेप्स आणि पोटरीच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधील काही सामन्यांना मुकलेला हार्दिक सध्या बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पुनरागमनासाठी कसून सराव करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us