AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे रक्तात आहे ते…! अनया बांगरने व्हिडीओ शेअर करत सांगितलं की… Watch Video

अनया बांगर सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिने एखादं ट्वीट किंवा पोस्ट केली की, त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. नुकतंचतिने ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव सर्जरी केली होती. आता तिने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे.

जे रक्तात आहे ते...! अनया बांगरने व्हिडीओ शेअर करत सांगितलं की... Watch Video
जे रक्तात आहे ते...! अनया बांगरने व्हिडीओ शेअर करत सांगितलं की... Watch VideoImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2025 | 9:38 PM
Share

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलगी सध्या चर्चेत आहे. अनाया बांगरने नुकतंच जेंडर ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. त्यानंतर तिने ब्रेस्ट ऑग्मेंटेशन आणि ट्रेकियल शेव सर्जरी केली. या बाबतची माहिती तिने 2 जुलैला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता पुन्हा एकदा सामान्यपणे वावरणं सुरु झालं आहे. या दरम्यान, अनाया बांगरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. अनाया बांगरने शस्त्रक्रियेनंतर आपल्या चाहत्याना अपडेट दिले आहेत. या शस्त्रक्रियेतून सावरण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पण शस्त्रक्रियेच्या एक महिन्यानंतरच तिने जिम आणि इतर गोष्टी करू शकते. आता शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे अनाया बांगरने रोजचा दिनक्रम सुरु केला आहे. तिने सोशल मीडियावर रोजचा दिनक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अनाया बांगरने शेअर केलेल्या व्हिडीओत ती आईस फेशियल करताना दिसत आहे. तसेच जिममध्ये एक्सरसाइज करते. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलेली गोष्ट सर्वांना आकर्षित करत आहे. अनाया बांगरने पोस्टमध्ये लिहिलं की, ‘प्रत्येक बाह्य अपयशानंतर, मला माझ्या आतला खेळाडू परत मिळवायचा आहे. पण रक्तात जे आहे ते तुम्ही म्यूट करू शकत नाही.’ यासोबत तिने बॅट आणि बॉलचा इमोजी शेअर केला आहे. या माध्यमातून अनाया बांगरने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत. अनायाला महिला क्रिकेटमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत काही स्पष्ट नाही. पण क्रिकेटच्या मैदानात सराव करताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

View this post on Instagram

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

लिंग बदलापूर्वी अनाया ही आर्यन बांगर म्हणून ओळखली जात होती. तसेच क्रिकेटचे धडे गिरवत होती. मुंबईसाठी अंडर 16 क्रिकेटमध्ये खेळली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि मुशीर खान या खेळाडूंसोबत खेळली आहे. अजूनही तिच्या इंस्टाग्राम खात्यावर फलंदाजीचे व्हिडीओ आहेत. इतकंच काय तर क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडरचा समावेश करण्याची मागणी केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.