AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी या संघाने घेतला मोठा निर्णय, हेड कोचला दाखवला बाहेरचा रस्ता

आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व सुरु होण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र असं असताना आतापासूनच फ्रेंचायझींमध्ये उलथापालथ सुरु झाली आहे. या संघाने आपल्या मुख्य प्रशिक्षकाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेमकं का केलं ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी या संघाने घेतला मोठा निर्णय, हेड कोचला दाखवला बाहेरचा रस्ता
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी या संघाने घेतला मोठा निर्णय, हेड कोचला दाखवला बाहेरचा रस्ताImage Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2025 | 7:01 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली आहे. सर्वच संघांची जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सनरायझर्स हैदराबादने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे. त्यांनी भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण आरोनला गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवडलं आहे. तर इतर फ्रेंचायझी ट्रेड विंडो आणि मिनी लिलावाच्या माध्यमातून खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स नव्या प्रशिक्षकासह मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने हेड कोच चंद्रकांत पंडित यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल किताब जिंकला होता. पण आता केकेआरला त्यांची साथ मिळणार नाही.

केकेआरच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण पंडित यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली मागच्या काही पर्वात केकेआरने चांगली कामगिरी केली होती. फ्रेंचायझीने ट्वीट करत माहिती दिली की, ‘श्री चंद्रकांत पंडित यांनी नवीन संधी शोधण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पुढे राहणार नाहीत. २०२४ मध्ये केकेआरला आयपीएल चॅम्पियनशिपमध्ये नेणे आणि एक मजबूत, लवचिक संघ तयार करण्यात मदत करणे यासह – त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांच्या नेतृत्वाचा आणि शिस्तीचा संघावर कायमचा प्रभाव पडला आहे. आम्ही त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’

चंद्रकांत पंडित यांचा केकेआरसोबत 2022 पासून प्रवास सुरु झाला होता. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमन यांच्या जागी त्यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तीन पर्वात केकेआरचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या नेतृत्वात केकेआरने 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. या विजयात चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर यांचा मोलाचा वाटा होता. पण 2025 च्या पर्वात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली. साखळी फेरीत 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवला. प्लेऑफमध्येही स्थान मिळवू शकले नाहीत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.