
आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 4 गडी राखून पराभूत केलं होतं. आता गुजरात टायटन्सने 36 धावांनी पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दव फॅक्टर पाहून मुंबईने हा निर्णय घेतला. पण हा निर्णय उलटा पडला. कारण गुजरात टायटन्सने विजयासाठी दिलेल्या धावा गाठणं काही मुंबईला जमलं नाही. गुजरात टायटन्सने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईची सुरुवात नेहमीप्रमाणे काही खास झाली नाही. रोहित शर्मा आणि रिकलटन ही जोडी फेल गेली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विजयाच्या वेशीवर आणता आलं नाही. झारखंडचा ख्रिस गेल म्हणून प्रसिद्ध असलेला रॉबिन मिंझ या सामन्यातही फेल गेला.
14 व्या षटकात मुंबई इंडियन्सने 4 गडी गमवून 112 धावा केल्या होत्या. त्यामुळे उर्वरित पाच षटकात 84 धावांची गरज होती. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. टाईम आऊटनंतर 15 वं षटक कर्णधार शुबमन गिल याने साई किशोरच्या हाती सोपलं. वैयक्तिक शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या साई किशोरसमोर हार्दिक पांड्या होता. पहिले दोन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतरच्या चेंडूवर चौकर मारला. पण चौथा चेंडूवर हार्दिकला फार काही करता येत नाही आणि बचावात्मक खेळतो. यावेळी चेंडू घेण्यासाठी साई किशोर पुढे सरकतो आणि हार्दिककडे कटाक्ष टाकतो. त्याची नजर पाहून हार्दिक पुढे येतो आणि हातावाऱ्याने जा असा सांगतो. पण साई किशोर पाहातच राहतो. तेव्हा दोघं एकमेकांच्या जवळ आल्याचं पाहून पंचांनी मध्यस्थी करून प्रकरण वाढू दिलं नाही. साई किशोरने 4 षटकात 37 धावा देत एक गडी बाद केला.
Fir Hardik Pandya ka Attitude aa gya
Sai kishor ne tagdi takkar di— Gaurav Pandey (@gaurav5pandey) March 29, 2025
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मुजीब उर रहमान, सत्यनारायण राजू