Aryavir Sehwag: पप्पा, मी मोठं शतक ठोकणार…! मैदानात उतरला अन् वचन पूर्ण करून दाखवलं; आर्यवीर सेहवागने सांगितला खास किस्सा

Aryavir Sehwag Heartfelt Message: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग सध्या चर्चेत आहे. १९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे.

Aryavir Sehwag: पप्पा, मी मोठं शतक ठोकणार...! मैदानात उतरला अन् वचन पूर्ण करून दाखवलं; आर्यवीर सेहवागने सांगितला खास किस्सा
Aryavir Sehwag Reveals Story Behind His Match-Winning 160
| Updated on: Nov 10, 2026 | 10:43 PM

19 वर्षांखालील आशिया कप 2026 च्या 11 व्या सामन्यात भारताने युएईचा 70 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 309 धावा केल्या. प्रत्युत्तरात युएईचा संघ 239 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला आर्यवीर सेहवाग, ज्याने 168 चेंडूंमध्ये 160 धावांची खेळी केली. आर्यवीर सेहवागने आपल्या खेळीत 17 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मोठा विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयानंतर आर्यवीर सेहवाग म्हणाला की, त्याने आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळले आहे.

सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर आर्यवीर सेहवाग म्हणाला, खूप छान वाटत आहे. खेळपट्टी थोडी फिरकी घेत होती. मी सुरुवात केली आणि 40 षटके फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर आव्हाने होती. मी निर्धाव चेंडूंची चिंता केली नाही. मला माहित होते की मी हे करू शकेन आणि मला मोठी धावसंख्या करायची होती. मी एका व्यक्तीला वचन दिले होते की मी आज मोठी धावसंख्या करेन आणि सुदैवाने मी ते पूर्ण केले. आणि ती व्यक्ती म्हणजे माझे वडील. मी माझ्या वडिलांना सांगितले होते की मी मोठे शतक करेन. मला त्यांचा वारसा जपायचा आहे, कारण त्यांना फक्त मोठी शतकेच आवडत असत.

Loading...

आर्यवीर आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांच्यामुळे भारताने चांगली सुरुवात केली. मात्र रायचंदानी 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर आर्यवीरने विनीतसोबत 183 चेंडूंमध्ये 193 धावांची भागीदारी केली. विनीतने 69 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या, तर आर्यवीर सेहवागने 168 चेंडूंमध्ये 160 धावा केल्या. यानंतर भारताची मधली फळी फार काही करू शकली नाही. अर्जुन राजपूतने 4, तर यशवर्धन चौहानने 17 धावा केल्या. अन्वय द्रविडला केवळ 12 धावांचे योगदान देता आले. तरीही संघाने 309 धावांचा मोठा डोंगर उभा केला.

अयान मिस्बाह आणि झैनुल्ला रहमानी यांनी युएईला वेगवान सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, पण मोहित उल्वाने संघाला यश मिळवून दिले. यानंतर काव्या पटेल आणि अर्जुन राजपूत यांनी अचूक गोलंदाजी करून युएईला धक्का दिला. अहमद खुदाबादने युएईसाठी शानदार 74 धावा केल्या, नूरुल्ला अयुबीने 39 धावा केल्या, पण इशान सूदने एकापाठोपाठ एक बळी घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. इशान सूदने 4 बळी घेतले. मनाल चौहान, काव्या पटेल, मोहित उल्वा, यशवर्धन चौहान, आर्यन सावसानी आणि अर्जुन राजपूत यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us