
बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. एशेज मालिकेची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कमबॅकचं आव्हान आहे. असं असताना इंग्लंडला दुसऱ्या सामन्यापूर्वी धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. (Photo: Getty Images)

मार्क वूड दुखापतीतून सावरत इंग्लंडमध्ये परतला होता.. पण पर्थ कसोटी मार्क वूडसाठी काही चांगली गेली नाही. दोन्ही डावात त्याची निराशाजनक गोलंदाजी राहिली. त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता दुसऱ्या कसोटीत त्याला आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. (Photo: Getty Images)

इंग्लंड क्रिकेट संघाने मार्क वूडची दुखापत आणि त्यातून सावरण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. मार्कच्या गुडघ्यावर मार्च महिन्यात सर्जरी झाली होती. त्यानंतर 9 महिन्यानंतर पहिला कसोटी सामना खेळला होता. पण या मालिकेत फिट झाल्याचं काही दिसून आलं नाही. त्यामुळे त्याला या मालिकेतील इतर सामन्यात फिट ठेवण्याचा प्रयत्न असेल. (Photo: Getty Images)

मार्क वूड पर्थ कसोटीत खेळणं कठीण होतं. पण त्याने पहिल्या कसोटीपूर्वी फिटनेस टेस्ट पास केली होती. आता या मालिकेतील उर्वरित सामन्यांचं गणित पाहता त्याला दुसऱ्या कसोटी आराम दिला गेला आहे. (Photo: Getty Images)

मार्क वूडच्या जागी वेगवान गोलंदाज जोश टंगला दुसऱ्या कसोटीत घेतलं आहे. वेगवान गोलंदाजी भारताविरुद्ध ऑगस्टमध्ये कसोटी खेळला होता. आता 4 डिसेंबरला डे नाईट कसोटीत ब्रिस्बेनमध्ये खेळणार आहे. (Photo: PTI)