
हेडिंग्ले | अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने 26 धावांच्या मदतीने दुसऱ्या दिवसापर्यंत 142 धावांची एकूण आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत 47 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 116 धावा केल्या आहेत. तर ट्रेव्हिस हेड 18 आणि मिचेल मार्श 17 धावांवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्यानंतर इंग्लंडला 237 धावांवर रोखलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Stumps at Headingley ?
The second day too has belonged to the bowlers, with 11 wickets falling ?#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/zRKTrBEhzx
— ICC (@ICC) July 7, 2023
दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा 43, डेव्हिड वॉर्नर 1, मार्नस लाबुशेन 33 आणि स्टीव्ह स्मिथ याने 2 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली याने 2 फलंदाजांना सलग 2 बॉलमध्ये आऊट केलं. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.