AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AUS 3rd Test | तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी इंग्लंड टीमची घोषणा

Eng vs Aus 2023 3rd Odi England Squad | इंग्लंड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.

ENG vs AUS 3rd Test | तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यासाठी इंग्लंड टीमची घोषणा
| Updated on: Jul 03, 2023 | 8:02 PM
Share

लंडन | ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2 जुलै रोजी अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात इंग्लंडला दुसऱ्या दुसऱ्यांदा पराभवाची धुळ चारली. कांगारुंनी या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. आता या मालिकेतील तिसरा सामना हा 6 जुलै ते 10 जुलै रोजी हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने मालिकेत पिछाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी तिसरा सामना निर्णायक आणि महत्वपूर्ण असणार आहे. इंग्लंडने या तिसऱ्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

2 खेळाडू टीममधून बाहेर

इंग्लंड टीममध्ये मोठा बदल झालेला नाही. मात्र 2 खेळाडू संघातून बाहेर झाले आहेत. मॅटी पॉट्स आणि रेहान अहमद बाहेर पडले आहेत. तिसऱ्या सामन्याआधी प्रमुख खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इंग्लंडचा स्टार बॅट्समन ओली पोप याला खांद्याची दुखापत आहे. ओली पोप खांद्यावर आवश्यक ते उपचार घेणार आहे. तर मोईन अली याला अजूनही अंगठीच्या दुखापतीचा त्रास सहन करावा लागतोय.

रेहान अहमद याला मोईल अली याच्या जागी दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र रेहानला हेडिंग्ले इथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून टीममधून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे मोईन अली तिसऱ्या सामन्यात दुखापतीनंतर कमबॅक करण्याची शक्यता आहे. तर पोपला दुसऱ्या सामन्यादरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. पोप या दुखापतीतून सावरुन तिसऱ्या कसोटीत खेळेल असा विश्वास टीम मॅनेजमेंटला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची घोषणा

कुणाला डच्चू मिळणार?

दरम्यान प्लेइंग इलेव्हनमधून ओली पोप आऊट झाला तर त्याच्या जागी डॅन लॉरेन्स याचा संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम

बेन स्टोक्स (कॅप्टन), मोईन अली, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉउली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ओली पोप, ओली रॉबिन्सन, जो रूट, जोश टोंग, क्रिस वोक्स आणि मार्क वुड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), जिमी पियरसन (विकेटकीपर), टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड, स्कॉट बोलँड आणि मायकल नेसर.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.