AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : भारताचं लाहोरमध्ये सामना खेळण्याचं संकट टळलं, पावसामुळे असं बदललं गणित

IND vs PAK Asia Cup Match : पाकिस्तान विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि टीम इंडियाचा जीव भांड्यात पडला असंच म्हणावं लागेल. पाकिस्तानने सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली तर भारताचं गणित ठरल्याप्रमाणे बसलं आहे.

IND vs PAK : भारताचं लाहोरमध्ये सामना खेळण्याचं संकट टळलं, पावसामुळे असं बदललं गणित
IND vs PAK : पावसामुळे भारताचा जीव पडला भांड्यात, लाहोरमध्ये खेळण्याचं ते संकट एका झटक्यात दूर झालं
| Updated on: Sep 02, 2023 | 11:13 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला. जवळपास दोन तास वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दोन्ही संघांना प्रत्येक एक गुण देण्यात आला आहे.दुसरीकडे तीन गुणांसह पाकिस्ताने सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. त्याचबरोबर भारताला पाकिस्तानात जाऊन एक सामना खेळण्याची गरज पडणार नाही. कारण पाकिस्तानने नेपाळ 238 धावांनी पराभूत केल्याने त्यांच्या रनरेट कमालीचा आहे. त्यामुळे भारताने नेपाळ विरुद्धचा सामना जिंकला तरी नेट रनरेट तितकं गाठणं शक्य नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजेच भारताने नेपाळला कमी फरकाने पराभूत केलं तर गुणांची भर पडेल. पण नेट रनरेट तितका होणार नाही.भारताचा पुढचा सामना नेपाळसोबत 4 सप्टेंबरला आहे.

पॉइंट टेबलमध्ये भारत पाकिस्तान यांची स्थिती काय?

पाकिस्तानने 2 पैकी 1 सामना जिंकत 3 गुणांसह +4.760 नेट रनरेट आहे. भारताच्या पदरात फक्त एका गुणाची कमाई झाली असून नेट रनरेट शून्य आहे. त्यामुळे अ गटात भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर राहील. दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला श्रीलंकेत सामना खेळावा लागणार आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या संघाला पाकिस्तानात सामना खेळावा लागेल. सुपर फोरमधील फक्त एक सामना वगळता बाकी सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले जाणार आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या आणि विजयासाठी 267 धावांचं आव्हान दिलं. मात्र पाकिस्तानचा डाव सुरु होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली. काही तास वाट पाहिल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण दिला.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यस स्वस्तात बाद झाले. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी चांगली कामगिरी केली. पाचव्या गड्यासाठी दोघांनी 138 धावांची भागीदारी केली. इशान किशनने 81 चेंडूत 82 धावा आणि हार्दिक पांड्याने 90 चेंडूत 87 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 4 गडी, हारिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....