
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत यूएई आणि पाकिस्ताननंतर शुक्रवारी 19 सप्टेंबरला ओमानला पराभूत करत सलग तिसरा विजय साकारला. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओमान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खेळताना 21 धावांनी विजय मिळवला. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.
भारताने ओमानसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नवख्या ओमानला हे विजयी आव्हान पूर्ण करता आलं नाही. मात्र ओमानने भारताला सहजासहजी जिंकून दिलं नाही. ओमानने भारताला विजयासाठी संघर्ष करायला भाग पाडलं. ओमानच्या फलंदाजांनी विजयासाठी पूर्ण जोर लावला. मात्र भारतासमोर त्यांना विजयी होता आलं नाही. मात्र त्यानंतरही ओमानने आपल्या कामगिरीने मनं जिंकली. ओमानने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. ओमानचा पराभव झाला. मात्र त्यांनी टी 20i क्रिकेटमधील संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.
2019 मध्ये अल अमेरात येथे आयर्लंडविरुद्ध 173/9 धावांनंतर ओमानने पूर्ण सदस्य देशाविरुद्ध 167 धावा केल्या आहेत. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळने 179/9 धावा केल्यानंतर असोसिएट संघाने भारताविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने विकेटचं शतक पूर्ण केलं. अर्शदीप सिंगने 4 षटकात 37 धावा देत 1 विकेट घेतली आणि शतक पूर्ण केलं.
भारताने विजयासाठी दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना ओमानने कडवी झुंज दिली. ओमानने ४ गडी गमवून १६७ धावा केल्या. भारताने या सामन्यात २१ धावांनी विजय मिळवला. पण ओमानच्या खेळीचं कौतुक झालं. एक वेळ अशी आली होती की सामना हातून जातो की काय? पण भारताने बाजी मारली. ओमानने येथे विद्यमान विश्वविजेत्या संघाविरुद्ध उत्तम कामगिरी केली आहे. ओमानच्या सलामीवीरांनी पॉवरप्ले खेळताना ५६ धावांची भागीदारी केली.
टीम इंडियाने ओमानला दुसरा झटका दिला आहे. हर्षीत राणा याने हार्दिक पंड्या याच्या हाती आमीर कलीम याला कॅच आऊट केलं. आमीरने ओमानसाठी 46 बॉलमध्ये 64 रन्स केल्या आहेत.
भारत विरुद्ध ओमान सामना रगंतदार स्थितीत पोहचला आहे. ओमानने 189 धावांचा पाठलाग करताना 17 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 141 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ओमानला विजयासाठी 18 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. कलीम 56 आणि मिर्जा 47 रन्सवर खेळत आहेत.
आमिर कलीम याने टी 20i कारकीर्दीतील एकूण दुसरं तर टीम इंडिया विरुद्धचं पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं आहे. आता ओमानला विजयासाठी 30 बॉलमध्ये 73 रन्सची गरज आहे. टीम इंडियाने ओमानसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
ओमानने 189 धावांचा पाठलाग करताना 12 ओव्हरनंतर टीम इंडिया विरुद्ध 1 विकेट गमावून 80 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ओमानला आता विजयासाठी 48 बॉलमध्ये 109 रन्सची गरज आहे. तर टीम इंडिया विकेटच्या शोधात आहेत
कुलदीप यादव याने ओमानला पहिला झटका दिला आहे. कुलदीपने ओमानचा कॅप्टन जतिंदर सिंह याला क्लिन बोल्ड केलं. जतिंदर आणि आमिर कलीम या जोडीने ओमानसाठी 56 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. जतिंदरने 32 रन्स केल्या.
ओमानच्या सलामी जोडीने धमाका केला आहे. टीम इंडिया विरुद्ध 189 धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी भागीदारी केली आहे. जतिंदर सिंह आणि आमीर कलीम या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. ओमानने 7 ओव्हरनंतर बिनबाद 51 रन्स केल्या आहेत.
ओमानने टीम इंडिया विरुद्ध 189 धावांचा पाठलाग करताना पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 44 धावा केल्या आहेत. कॅप्टन जतिंदर सिंह 26 आणि आमिर कलीम 17 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. त्यामुळे टीम इंडिया सामन्यात कमबॅक करायचं असेल तर लवकरात लवकर ही जोडी फोडावी लागणार आहे.
ओमानने टीम इंडिया विरुद्ध 189 धावांचा पाठलाग करताना संयमी आणि आश्वासक सुरुवात केली आहे. कॅप्टन जतिंदर सिंह आणि आमिर कलीम या जोडीने ओमानला चांगली सुरुवात मिळवून दिलीय. या दोघांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 रन्स केल्या आहेत.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामन्यातील दुसऱ्या डावाल सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने ओमानसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ओमानकडून या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी जतिंदर सिंह आणि कलीम ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडियाने ओमानसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. टीम इंडियासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक धावा केल्या. संजूने 56 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा याने 38, तिलक वर्मा 29 आणि अक्षर पटेल याने 26 धावा केल्या. तर ओमानसाठी एकूण तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
ओमानने टीम इंडियाला 19 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले आहेत. ओमानने तिलक वर्मा याला आऊट करत भारताला सातवा झटका दिला. जितेन रामानंदी याने तिलकला 19 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅच आऊट केलं. त्यानंतर रामानंदी याने आपल्याच बॉलिंगवर अर्शदीपला सहाव्या बॉलवर रन आऊट केलं. अशाप्रकारे भारताने एकूण 8 विकेट्स गमावल्या.
टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. भारताने संजू सॅमसन आऊट झाला आहे. संजूला आणखी मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र संजू अर्धशतकानंतर आऊट झाला. संजूने 45 बॉलमध्ये 56 रन्स केल्या.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याने ओमान विरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. संजूने 17 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर चौकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. संजूच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 17 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 167 धावा केल्या आहेत.
ओमानने शिवम दुबे याला आऊट करत भारताला पाचवा झटका दिला आहे. आमीर कलीम याने शिवमला कॅप्टन जतिंदर सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. शिवमने 8 बॉलमध्ये 5 रन्स केल्या.
ओमानने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. आमीर कलीम याने अक्षर पटेल याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आमीरने अक्षरला विनायक शुक्ला याच्या हाती कॅच आऊट केलं. अक्षरने 13 बॉलमध्ये 3 फोर आणि 1 सिक्ससह 26 रन्स केल्या.
टीम इंडियाने 10 चा रनरेट कायम ठेवत 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल ही जोडी मैदानात खेळत आहे. तर शुबमन गिल, अभिषेक शर्मा आणि हार्दिक पंड्या तिघे आऊट झाले.
भारतीय संघाला हार्दिक पांड्याच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादवने प्रयोग करत त्याला वर फलंदाजीला पाठवलं होतं. पण त्याला काही खास करता आलं नाही. फक्त 1 धाव केली आणि धावचीत होत तंबूत परतला.
अभिषेक शर्मा 38 धावांची खेळी बाद तंबूत परतला आहे. 15 चेंडूत 5 चौकार आणि 2 मारून 38 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 253.33 चा होता.
टीम इंडियाने पावरप्लेमध्ये (6 ओव्हर) 10 च्या रन रेटने 1 विकेट गमावून 60 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी मैदानात खेळत आहे. अभिषेक 38 आणि संजू सॅमसन 13 धावांवर नाबाद खेळत आहेत.
टीम इंडियाने ओमान विरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं आहे. टीम इंडियाने 31 बॉलमध्ये अर्थात 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं आहे. अभिषेक शर्मा आणि संजू सॅण सॅमसन जोडी मैदानात खेळत आहे. तर भारताने शुबमन गिल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली आहे.
ओमानने टीम इंडियाला दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिला आणि मोठा झटका दिला आहे. ओमानच्या शाह फैसल याने दुसऱ्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर उपकर्णधार शुबमन गिल याला क्लिन बोल्ड केलं. शुबमन गिल 8 बॉलमध्ये 5 रन्स करुन आऊट झाला.
टीम इंडिया विरुद्ध ओमान सामन्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर ओमानसाठी शकील अहमद पहिली ओव्हर करत आहे.
टीम इंडियाने या स्पर्धेत ओमान विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि ओमानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओमान टीम इंडियाच्या तुलनेत लिंबुटिंबु आहे. त्यामुळे टीम इंडियाचे फलंदाज ओमान विरुद्ध किती धावा करतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
ओमान प्लेइंग ईलेव्हन : आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधर), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव आणि जितेन रामानंदी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
टीम इंडियाने ओमान विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. यासह टीम इंडियाची या स्पर्धेत टॉस जिंकून बॅटिंग करण्याची पहिलीच वेळ असणार आहे. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण कोण आहे.
यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा ओमानविरुद्धचा सामना टी 20i क्रिकेट इतिहासातील 250 वा सामना ठरणार आहे. भारतीय संघ यासह 250 टी 20i सामने खेळणारी दुसरी टीम ठरणार आहे.
टीम इंडिया साखळी फेरीत अजिंक्य आहे. भारताने साखळी फेरीत खेळलेले दोन्ही सामने जिंकलेत. भारताने यूएई आणि पाकिस्तानला पराभूत केलंय. तर ओमनाला खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. ओमानवर पाकिस्तान आणि यूएईने विजय मिळवला. ओमानची आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्याची यंदाची पहिलीच वेळ होती. मात्र ओमानला या संधीचं सोनं करता आलं नाही.
आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने भारत आणि ओमान यांच्यात आमनासामना होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघात एकदाही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. त्यामुळे ओमानचा टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी ओमान टीम : जतिंदर सिंग (कॅप्टन), विनायक शुक्ला (विकेटकीपर), आमिर कलीम, हम्माद मिर्झा, वसीम अली, हसनैन शाह, शाह फैसल, जितेन रामानंदी, आर्यन बिश्त, शकील अहमद, समय श्रीवास्तव, मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, करण सोनावळे, आशिष ओडेदरा, मोहम्मद इम्रान, जिक्रीया इस्लाम, नदीम खान आणि सुफयान युसुफ.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील आपला तिसरा आणि शेवटचा सामना ओमान विरुद्ध खेळणार आहे. उभयसंघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट आपण लाईव्ह ब्ल़ॉगमधून जाणून घेणार आहोत.