
आशिया कप 2025 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारत विरुद्ध ओमान यांच्यात टक्कर होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
कॅप्टन सूर्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांना विश्रांती दिली आहे. तर हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांचा हा या स्पर्धेतील पहिलावहिला सामना असणार आहे. त्यामुळे हे दोघे बॉलिंगने कसं योगदान देतात याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियात एकसेएक स्फोटक फलंदाज आहेत. मात्र या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात कर्णधार सूर्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे चाहत्यांना भारतीय फलंदाजांकडून फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. मात्र ओमान विरुद्ध सूर्याने बॅटिंगचा निर्णय घेत फलंदाजांना फटकेबाजीची संधी दिली आहे. त्यामुळे टीम इंडिया ओमान विरुद्ध 120 बॉलमध्ये किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
दरम्यान टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडयाने साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने यूएई आणि पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाला ओमानवर मात करुन विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
टीम इंडिया टॉसचा बॉस
🚨 Toss 🚨#TeamIndia won the toss and have elected to bat 🙌
Updates ▶️ https://t.co/XAsd5MHdx4
#INDvOMA | #AsiaCup2025 pic.twitter.com/SlPkBk1h1k
— BCCI (@BCCI) September 19, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव.
ओमान प्लेइंग ईलेव्हन : आमिर कलीम, जतिंदर सिंग (कर्णधर), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), शाह फैसल, जिक्रिया इस्लाम, आर्यन बिश्त, मोहम्मद नदीम, शकील अहमद, समय श्रीवास्तव आणि जितेन रामानंदी.