AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 Ind vs Pak Live Streaming : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

Asia cup 2025 India vs Pakistan Live Streaming : आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ या मोहिमेतील आपला सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी आमनेसामने भिडणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे.

Asia Cup 2025 Ind vs Pak Live Streaming : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
Asia Cup 2025 India vs Pakistan Live StreamingImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 14, 2025 | 1:12 AM
Share

क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे. टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत. पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 14 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी या मोहिमेत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाने 10 सप्टेंबरला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात यूएई विरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. भारताने यूएईवर 9 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानने 12 सप्टेंबरला ओमानवर मात केली. त्यानंतर आता दोन्ही संघांची टक्कर होणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तररित्या जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे बघता येणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहायला मिळेल.

सुपर 4 मध्ये कोण पोहचणार?

आशिया कप स्पर्धेतील पुढच्या फेरीत अर्थात सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी प्रत्येक संघाला साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने जिंकणं अनिर्वाय आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी सुपर 4 च्या हिशोबाने 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. तर 50 टक्के काम बाकी आहे. रविवारी भारत-पाकिस्तान सामन्यातील विजयी संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल. हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे सुपर 4 मधील स्थान निश्चित करण्याची बरोबरीची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात एकमेकांवर कुरघोडी करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. या प्रयत्नात दोघांपैकी कोणत्या संघाला यश येणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना