SL vs AFG : एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, Mohammad Nabi चा फिनिशींग टच, श्रीलंकेसमोर 170 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Mohammad Nabi Asia Cup 2025 SL vs AFG : अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने 20 व्या ओव्हरमध्ये दुनिल वेलालागे याची धुलाई करत 31 धावा कुटल्या. नबीने पहिल्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स लगावले.

SL vs AFG : एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, Mohammad Nabi चा फिनिशींग टच, श्रीलंकेसमोर 170 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Mohammad Nabi Asia Cup 2025 SL vs AFG
Image Credit source: @ACBofficials X Account
| Updated on: Sep 18, 2025 | 10:44 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील 11 व्या सामन्यात अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने केलेल्या स्फोटक आणि अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर 170 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मोहम्मद नबी याने 20 व्या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये सलग 5 सिक्स लगावत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. नबीने सलग 5 सिक्ससह श्रीलंकेच्या बाजूने झुकलेला सामना आपल्या बाजूने फिरवला. नबीने सलग 5 सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. मात्र नबी दुनिथ वेलालागे याने टाकलेल्या 20 व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर सलग सहावा सिक्स लगावण्यात अपयशी ठरला. नबी दुसरी धाव घेताना स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. मात्र नबीने त्याची भूमिका चोखपणे पार पाडली. नबीने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या 31 धावांमुळे अफगाणिस्तानला 8 विकेट्सने गमावून 169 पर्यंत मजल मारता आली. नबीने 6 सिक्स आणि 3 फोरसह 22 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. आता अफगाणिस्तानचे गोलंदाज 169 धावांचा यशस्वी बचाव करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

अफगाणिस्तानची बॅटिंग

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या प्रमुख फलंदाजांनी कॅप्टन राशीद खान याचा निर्णय चुकीचा ठरवला. काही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे अफगाणिस्तानची 12.1 ओव्हरमध्ये 6 आऊट 79 अशी स्थिती झाली. त्यानंतर राशीद खान आणि मोहम्मद नबी या दोघांनी सातव्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या. त्यानंतर राशीद 24 धावा करुन आऊट झाला. अफगाणिस्तानने राशीदच्या रुपात 17.1 ओव्हरमध्ये 114 रन्सवर सातवी विकेट गमावली.

मोहम्मद नबीचा तडाखा, 5 ओव्हरमध्ये 5 सिक्स, पाहा व्हीडिओ

राशीद आऊट झाल्यानंतर नूर अहमद मैदानात आला. राशीद मैदानात असेपर्यंत नबी संयमाने खेळत होता. मात्र शेवटची काही चेंडू बाकी असताना नबीने आपला गिअर बदलला. नबीने फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र नबीने 20 व्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमाल केली.

20 व्या ओव्हरमध्ये नबीने गेम बदलला

नबीने 22 वर्षीय युवा फिरकीपटू दुनिथ वेलालागे याची धुलाई केली. नबीने पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिक्स लगावले. त्यानंतर दुनिथने नो बॉल टाकला. नबीने चौथ्या बॉलवर (फ्री हीट) पुन्हा सिक्स लगावला. नबीने पाचव्या बॉलवर खणखणीत षटकार खेचला. नबीने अशाप्रकारे 5 बॉलमध्ये 5 सिक्स लगावले. त्यानंतर दुनिथने शेवटचा बॉल हुशारीने टाकला. त्यामुळे नबी मोठा फटका मारु शकला नाही. मात्र त्यानंतरही नबीने 1 धाव घेतली आणि दुसरी धाव घेताना रन आऊट झाला. अशाप्रकारे पहिल्या डावातील शेवटच्या बॉलवर नबीच्या कडक खेळीचा शेवट झाला. तर नूर अहमद याने नबीचा चांगली साथ दिली. नूरने 6 धावांचं योगदान दिलं.