आसीफ अलीच्या गनशॉट अ‍ॅक्शनवर भडकलेल्या राजदूतांना पाकिस्तानातून उत्तर, थेट एमएस धोनीशी तुलना

| Updated on: Oct 31, 2021 | 3:31 PM

असिफने सामन्याच्या शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही आणि त्यांनी शनिवारी ट्विटरवरून आसिफवर टीका केली. त्याने लिहिले की, “पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बंदूक दाखवणे हे लज्जास्पद कृत्य आहे."

आसीफ अलीच्या गनशॉट अ‍ॅक्शनवर भडकलेल्या राजदूतांना पाकिस्तानातून उत्तर, थेट एमएस धोनीशी तुलना
Asif Ali
Follow us on

दुबई : पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी ICC T20 विश्वचषक-2021 स्पर्धेत अफगाणिस्तानच्या हातात असलेला सामना हिरावला. अफगाणिस्तान संघाने त्यांना पराभूत केले असते पण आसिफ अलीने निर्णायक वेळी आपल्या फलंदाजीने संघाला तारलं. आसिफने एकाच षटकात चार षटकार ठोकत संघाला एक षटक आधीच विजय मिळवून दिला आणि आपल्या संघाला दारुण पराभवापासून वाचवले. तेव्हापासून आसिफ चर्चेत आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. मात्र याचदरम्यान एक व्यक्ती आसिफवर चिडली आहे. ही व्यक्ती आहे अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत एम. अश्रफ हैदरी. (Asif Ali copy MS Dhoni’s gun-shot celebration after hitting four sixes)

असिफने सामन्याच्या शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही आणि त्यांनी शनिवारी ट्विटरवरून आसिफवर टीका केली. त्याने लिहिले की, “पाकिस्तानच्या प्रमुख खेळाडूने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बंदूक दाखवणे हे लज्जास्पद कृत्य आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्याला आणि त्याच्या संघाला कडवे आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, खेळ ही हेल्दी स्पर्धा, मैत्री आणि शांतता यासाठी आहे.

धोनीशी तुलना

हैदरीच्या या ट्विटपूर्वीच आसिफचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. आसिफ अलीचे गनशॉट सेलिब्रेशन पाहून लोकांना महेंद्रसिंग धोनीचे जुने रूप आठवले. 2005 मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून धोनीने त्याच पद्धतीने शतक साजरे केले होते. अनेक ट्विटर युजर्सनी धोनी आणि आसिफचे एकत्र फोटो ट्विट केले आहेत.

अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या ट्विटशिवाय इतरही काही लोकांनी आसिफवर टीका केली पण अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राचे क्रीडा पत्रकार अब्दुल गफ्फार यांनी हैदरी यांना उत्तर देताना लिहिले आहे की, त्यांनी खेळ आणि राजकारणापासून दूर राहावे. त्यांनी लिहिले आहे की, “धोनीनेही अशाच पद्धतीने श्रीलंकेविरुद्ध शतक साजरे केले होते पण श्रीलंकेकडे मेंदू होता आणि ते चांगल्या भावनेने क्रिकेट खेळत होते. खेळ आणि राजकारणाला एकत्र करुन नका.

इतर बातम्या

T20 World Cup : हार्दिक पंड्याला आणखी एक संधी, NZ विरुद्धच्या सामन्यात जुन्या Playing XI सह टीम इंडिया मैदानात उतरणार?

T20 World Cup मध्ये 6 चेंडूत 4 षटकार ठोकून सामना जिंकणाऱ्या खेळाडूचा ट्विटरवर सवाल, ‘अजून काही आदेश?’

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे

(Asif Ali copy MS Dhoni’s gun-shot celebration after hitting four sixes)