
टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतही विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर 20 फेब्रुवारीला 6 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने त्याआधी 12 फेब्रुवारीला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवत इंग्लंडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप केलं. इंग्लंड त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडसह या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. इंग्लंड या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 22 फेब्रुवारीला खेळणार आहे. इंग्लंडसमोर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.
इंग्लंडने या सामन्यासाठी नेहमीप्रमाणे काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने 20 फेब्रुवारीलाच आपल्या 11 शिलेदारांची नावं जाहीर केली आहेत. जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने टीम इंडियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातील आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी सारखीच प्लेइंग ईलेव्हन ठेवलेली नाही. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतविरुद्ध असेलल्या प्लेइंग ईलेव्हनमधून 3 बदल केले आहेत. त्यानुसार संघात विकेटकीपर जेमी स्मिथ याचं कमबॅक झालं आहे. जोस बटलर आणि फिल सॉल्ट हे दोघे असूनही जेमी स्मिथ हाच विकेटकीपिंग करणार आहे. तर जेमी तिसऱ्या स्थानी बॅटिंग करणार आहे. फिल सॉल्ट याने टीम इंडियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विकेटकीपरची भूमिका बजावली होती.
तसेच टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळणाऱ्या टॉम बँटन, गस एटकीन्सन आणि साकिब महमूद या तिघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर करण्यात आलं आहे. इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये तिघांचं कमबॅक झालं आहे. या तिघांमध्ये जेमी स्मिथसह ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश आहे.
इंग्लंडचे 11 शिलेदार
We’ve named our XI for the first game against Australia 👇
— England Cricket (@englandcricket) February 20, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन), फिल साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि मार्क वुड.
टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या वनडेत अशी होती इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कॅप्टन), लियाम लिविंगस्टोन, गस एटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड आणि साकिब महमूद.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस एटकिन्सन, टॉम बँटन, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट आणि मार्क वूड.