AUS vs IND : टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिकाही गमावली, ऑस्ट्रेलियाचा 122 धावांनी धमाकेदार विजय

Australia vs India Womens 2nd Odi Match Result : पुरुषांनंतर ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. वूमन्स ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे.

AUS vs IND : टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिकाही गमावली, ऑस्ट्रेलियाचा 122 धावांनी धमाकेदार विजय
| Updated on: Dec 08, 2024 | 4:02 PM

ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तसेच डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मेन्स पाठोपाठ यजमान वूमन्स ऑस्ट्रेलियाने वूमन्स टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्लियाने या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकला. कांगारुंनी यासह मालिकाही खिशात घातली. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 371 धावांचा डोंगर उभा केला. एलिसा पेरी आणि जॉर्जिया वॉल या दोघींनी स्फोट शतकी खेळी केली. तर फोबी लिचफिल्ड आणि बेथ मूनी या दोघींनी अर्धशतक झळकावलं. एलिसा आणि जॉर्जिया या दोघींनी 105 आणि 101 धावा केल्या. तर फोबीने 60 आणि मूनीने 56 धावांचं योगदान दिलं. या चोघींच्या तोडफोड खेळीमुळे भारताला 372 धावांचं आव्हान मिळालं. वूमन्स टीम इंडियानेही चांगली फाईट दिली. फलंदाजांनी सघंर्ष केला मात्र डोंगराएवढ्या आव्हानापुढे त्या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. टीम इंडिया 44.5 ओव्हरमध्ये 249 ऑलआऊट झाली.

टीम इंडियाकडून रिचा घोष हीने सर्वाधिक 54 धावा केल्या.जेमिमाह रॉड्रिग्स हीने 43 धावा जोडल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौर 38 धावांवर बाद झाली. दीप्ती शर्मा हीने 10 आणि हर्लीन देओलने 12 धावा जोडल्या. तर मिन्नू मणी हीने नाबाद 46 धावा करुन पराभवातील धावांचं अंतर कमी केलं. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी ॲनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 4 विके्टस घेतल्या. तर इतर 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

भारताचा मालिका पराभव

ऑस्ट्रेलिया महिला प्लेइंग इलेव्हन : ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वॉल, एलिस पेरी, बेथ मुनी (विकेटकीपर), ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रिया पुनिया, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, सायमा ठाकोर आणि रेणुका ठाकूर सिंग.