AUS vs IND : बुमराह-सिराजची कमाल, टीम इंडियाचं कमबॅक, ऑस्ट्रेलिया 337 वर ऑलआऊट, यजमानांकडे 157 धावांची आघाडी

AUS vs IND 2nd Test : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 180 धावांच्या प्रत्युत्तरात 337 धावांपर्यंत मजल मारली आणि 157 धावांची आघाडी घेतली.

AUS vs IND : बुमराह-सिराजची कमाल, टीम इंडियाचं कमबॅक, ऑस्ट्रेलिया 337 वर ऑलआऊट, यजमानांकडे 157 धावांची आघाडी
rohit sharma mohammad siraj and team india
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 07, 2024 | 3:19 PM

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्धच्या दुसऱ्या आणि पिंक बॉल टेस्ट मॅचमधील दुसऱ्या दिवशी 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात टीम इंडियाच्या 180 धावांच्या प्रत्युत्तरात ऑलआऊट 337 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 150 पेक्षा मोठी आघाडी घेता आली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हेडने 4 सिक्स आणि 17 फोरसह 99.29 च्या स्ट्राईक रेटने 140 धावा केल्या. मार्नस लबुशेन याने 64 धावांची खेळी केली. हेड आणि लबुशेन या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या फलंदाजांना मोठी खेळी करु दिली नाही आणि वेळीच रोखत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. उस्मान ख्वाजा 13, नॅथन मॅकस्वीनी 39, स्टीव्हन स्मिथ 2, मिचेल मार्श 9, एलेक्स कॅरी 15, पॅट कमिन्स, 12 आणि मिचेल स्टार्क याने 18 धावा केल्य. स्कॉट बोलँड याला भोपळाही फोडता आला नाही. तर नॅथन लायन धावांवर नाबाद राहिला.

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने निर्णायक क्षणी कमबॅक केल्याने ऑस्ट्रेलियाला 157 पेक्षा मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्यात यश आलं. सिराज आणि बुमराह या दोघांव्यतिरिक्त आर अश्विन आणि नितीश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाला 337 धावांवर रोखण्यात यश

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.