AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : बुम बुम.., W,W,W, जसप्रीतचा ॲडलेडमध्ये धमाका, झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक

Jasprit Bumrah Break Zaheer Khan Record : जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसर्‍या कसोटीत पहिले 3 विकेट्स घेत झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

AUS vs IND : बुम बुम.., W,W,W, जसप्रीतचा ॲडलेडमध्ये धमाका, झहीर खानचा रेकॉर्ड ब्रेक
Jasprit bumrah team india aus vs ind 2nd testImage Credit source: Bcci x Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 07, 2024 | 11:40 AM
Share

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियात विक्रम करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. बुमराहने रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला. बुमराह यासह ऑस्ट्रेलियात अजिंक्य रहाणे नंतर पहिल्याच सामन्यात विजय मिळवून देणारा पहिला कर्णधार ठरला. त्यानंतर बुमराहने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 6 डिसेंबरला उस्मान ख्वाजा याला आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. बुमराह यासह टीम इंडियासाठी एका वर्षात 50 विकेट्स घेणारा कपिल देव आणि झहीर खान यांच्यानंतर तिसरा गोलंदाज ठरला. त्यानंतर आता बुमराहने आणखी एक कारनामा केला आहे.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या दिवशी 2 झटके दिले. बुमराहने नॅथन मॅकस्वीनी आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांना बाद केलं. बुमराहने स्मिथला आऊट करताच इतिहास घडवला. बुमराह यासह टीम इंडियासाठी एका वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. बुमराहने श्रीरामपूर एक्सप्रेस झहीर खान याचा 50 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. झहीरने 2002 साली 50 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता बुमराहरने झहीरला मागे टाकलं आहे.

सामन्यात आतापर्यंत काय झालं?

दरम्यान टीम इंडियाचा पहिला डाव हा 180 धावांवर आटोपला. त्यानंतर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 1 विकेट गमावून 86 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया 94 धावांनी पिछाडीवर होती. बुमराहने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवशी 91 धावांवर दुसरा तर 103 वर तिसरा झटका दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मार्नस लबुशेन याच्या रुपात चौथी विकेट गमावली. लबुशेन 64 धावा करुन माघारी परतला. तर त्यानंतर पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा ट्रेव्हिस हेड 53 आणि मिचेल मार्श 2 धावांवर नाबाद परतले आहेत. ऑस्ट्रेलियाने 59 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 191 धावा केल्या आहेत. यजमानांकडे 11 धावांची आघाडी आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश रेड्डी, रवीचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...