
भारतीय क्रिकेट चाहत्यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे. चाहत्यांनी आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने टी 20i सीरिजचा थरार अनुभवला. त्यानंतर भारताने विंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेतून शुबमन गिल एकदिवसीय कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.तसेच पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. पहिला सामना कुठे होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना रविवारी 19 ऑक्टोबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना पर्थ स्टेडियममध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहता येईल.
बीसीसीआय निवड समितीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यासह भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. बीसीसीआयने शुबमन गिल याला कर्णधार केलं.
शुबमनने इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमनने त्या दौऱ्यात कॅप्टन आणि बॅट्समन या दोन्ही भूमिका चोखपणे पार पाडल्या. शुबमनने आपल्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तसेच शुबमनने 700 पेक्षा अधिक धावाही केल्या. आता शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कॅप्टन म्हणून मैदनात उतरणार आहे. त्यामुळे शुबमनसमोर भारताला विजयी करण्याचं आव्हान असणार आहे. शुबमन या मालिकेत कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे ग्रीनच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात कॅमरुन ग्रीन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लबुशेन टीम इंडिया विरुद्ध कॅमरुनची उणीव भरुन काढणार का? याकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं लक्ष असणार आहे.