Dewald Brevis : 20 बॉल 96 रन्स, डेवाल्ड ब्रेव्हीसचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळी शतक, कांगारुंचा माज उतरवला

Australia vs South Africa 2nd T20I : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हीस याने दुसऱ्या आणि करो या मरो टी 20i सामन्यात नाबाद 125 धावांची खेळी करत असंख्य रेकॉर्ड ब्रेक केले.

Dewald Brevis : 20 बॉल 96 रन्स,  डेवाल्ड ब्रेव्हीसचं ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळी शतक, कांगारुंचा माज उतरवला
Dewald Brevis Century
Image Credit source: Robert Cianflone/Getty Images
| Updated on: Aug 12, 2025 | 5:37 PM

दक्षिण आफ्रिकेचा युवा आणि स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हीस याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या आणि करो या मरो असलेल्या टी 20i सामन्यात स्फोटक आणि विक्रमी शतकी खेळी साकारली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 200 पार मजली मारली आहे. ब्रेव्हीसने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करण्यात यशस्वी ठरणार की ब्रेव्हीसची शतकी खेळी व्यर्थ जाणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

ब्रेव्हीसची विक्रमी शतकी खेळी

ब्रेव्हीसने या शतकी खेळीसह एका झटक्यात असंख्य रेकॉर्ड ब्रेक केले. तसेच ब्रेव्हीसआधी दक्षिण आफ्रिकेच्या एकालाही अशी कामगिरी करता आली नाही. ब्रेव्हीसने नक्की काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

डार्विनमधील अरारा क्रिकेट ग्राउंडमध्ये आज 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या टी 20i या सामन्यात ब्रेव्हीस चौथ्या स्थानी बॅटिंगला आला. ब्रेव्हीसची सुरुवात काहीशी संथ झाली. मात्र ब्रेव्हीसने त्यानंतर गिअर बदलला आणि मैदानात चौफेर फटकेबाजी करत कांगारुंच्या गोलंदाजांची धुलाई केली. ब्रेव्हीसने यासह पहिलवहिलं टी 20i अर्धशतक पूर्ण केलं. ब्रेव्हीसचं पाहता पाहता शतक केव्हा झालं हे देखील समजलं नाही. ब्रेव्हीसने अर्धशतक ते शतक हा टप्पा अवघ्या 16 चेंडूत पूर्ण केला.

ब्रेव्हीसने अवघ्या 41 बॉलमध्ये टी 20i कारकीर्दीतील शतक पूर्ण केलं. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i शतक करणारा सर्वात युवा तर आणि डेव्हिड मिलर याच्यानंतरचा दुसरा फलंदाज ठरला. ब्रेव्हीसने वयाच्या 22 वर्ष 105 व्या दिवशी ही कामगिरी करुन दाखवली. तसेच मिलरने 35 चेंडूत शतक केलं होतं. तसेच दक्षिण आफ्रिकेची ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली.

डेवाल्ड ब्रेव्हीसचं पहिलंच आणि कडक टी 20i शतक

फाफ डु प्लेसीसचा रेकॉर्ड ब्रेक

ब्रेव्हीसने अवघ्या 56 चेंडूत 223.21 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 125 धावांची खेळी केली. ब्रेव्हीसने या दरम्यान 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने एकूण 20 चेंडूत 96 धावा केल्या. ब्रेव्हीस यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i मध्ये सर्वोच्च खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला. ब्रेव्हीसने याबाबतीत फाफ डु प्लेसीस याचा 10 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. फाफने 2015 मध्ये विंडीज विरुद्ध 119 धावा केल्या होत्या.