
दक्षिण आफ्रेकिने दुसऱ्या आणि करो या मरो टी 20I सामन्यात ऑस्ट्रेलियावर 53 धावांनी मात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंना 17.4 ओव्हरमध्ये 165 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने यासह कांगारुंचा विजयी रथ रोखला. ऑस्ट्रेलिया सलग दहावा टी 20I सामना जिंकण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे शनिवारी 16 ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे.
डेवाल्ड ब्रेव्हिस याने केलेल्या नाबाद 125 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने कांगारुंसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं. ऑस्ट्रेलियाकडून फक्त 5 जणांनाच दुहेरी आकडा गाठता आला. टीम डेव्हिड याने स्फोटक अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र डेव्हिडव्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करता आली नाही. एलेक्स कॅरी, कर्णधार मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि बेन द्वारशुइस या चौघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र यांनाही काही खास करता आलं नाही.
डेव्हिडने स्फोटक अर्धशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र डेव्हिडव्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करता आली नाही. टीम डेव्हिड याने 24 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्ससह 50 रन्स केल्या. एलेक्स कॅरीने 26, मिचेल मार्श 22, ग्लेन मॅक्सवेल 16 आणि बेन द्वारशुइस याने 12 धावांचं योगदान दिलं. त्या व्यतिरितक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून सातही जणांनी किमान 1-1 विकेट घेतली. क्वेना मफाका आणि कॉर्बिन बॉश या दोघांनी सर्वाधिक आणि प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर कगिसो रबाडा, कॅप्टन एडन मारक्रम, लुंगी एन्गिडी आणि Nqabayomzi Peter या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. डेवाल्ड ब्रेव्हीस याने या संधीचा चांगलाच फायदा घेतला. डेवाल्डने चौथ्या स्थानी येऊनही नाबाद आणि स्फोटक खेळी साकारली.
डेवाल्डने 56 चेंडूत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 125 धावा केल्या.डेवाल्ड यासह दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20I मध्ये वेगवान शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. डेवाल्ड व्यतिरिक्त ट्रिस्टन स्टब्स याने 31 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनीही धावा जोडल्या.
तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड सर्वात महागडा गोलंदाज ठरला. जोशने सर्वाधिक 56 धावा दिल्या. तर ग्लेन मॅक्सवेल आणि सीन एबोट या दोघांनी प्रत्येकी 44 धावा दिल्या. तर एडम झॅम्पाने 46 धावा लुटवल्या.
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 16 ऑगस्टला होणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. अशात मालिका विजेता कोण ठरतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.