
सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सिडनीत तिसरा कसोटी सामना सुरु आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. त्यांची सुरुवात चांगली झाली. पण फलंदाजी सुरु असताना, मार्नस लाबुशेनने जी कृती केली, त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. लाबुशेनने फलंदाजी सुरु असताना, सिगारेटचा इशारा केला. पॅव्हेलयिनमध्ये बसलेल्या सहकारी खेळाडूंकडे पाहून लाबुशेनने हा इशारा केला. त्याने लायटरची सुद्धा मागणी केली. जेव्हा त्याला ते मिळालं, तेव्हा त्याने मैदानातच आग पेटवली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, लाइव्ह मॅच सुरु असताना, त्याने सिगारेट आणि लायटरचा इशारा का केला?
दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी डोकेदुखी ठरु शकतो
मार्नस लाबुशेन सिडनी टेस्टमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. त्याने दमदार फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. फिफ्टी प्लस धावा सुद्धा त्याने केल्या. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, ते पाहून दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी तो मोठी डोकेदुखी ठरु शकतो.
Labuschagne asking for Lighter for some repair work in helmet. pic.twitter.com/ueJsfOynRC
— Johns. (@CricCrazyJohns) January 4, 2023
टीमकडे लायटर मागितलं
सिडनी टेस्टच्या पहिल्या दिवशी खराब प्रकाशाने मॅचमध्ये अडचण आणली. खराब प्रकाशामुळे मॅच थांबण्याआधी मैदानावर जे दृश्य दिसलं, ते हैराण करुन सोडणारं होतं. लाबुशेनने पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या आपल्या टीमकडे लायटर मागितलं. जेव्हा त्यांना कळलं नाही, तेव्हा त्याने सिगारेट पिण्याचा इशारा करुन समजावलं. लायटर मिळाल्यानंतर लाबुशेनने ते लायटर पेटवलं.
लायटर मागितलं, पण सिगारेट पिण्यासाठी नाही, तर….
लाबुशेनने लायटर मागितलं, ते सिगारेट पेटवण्यासाठी मागितलं, असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. कारण लाइव्ह मॅचमध्ये तो असं करु शकत नाही. मग लाबुशेनने लायटर का मागितलं? लाबुशेनच्या हेल्टमेटमध्ये थोडा प्रॉब्लेम होता. तो दुरुस्त करण्यासाठी त्याने लायटर मागितलं होतं. लायटर मिळाल्यानंतर ते पेटवून त्याने हेल्मेट दुरुस्त केलं.