Mumbai Indians ने 17.50 कोटीला विकत घेतलेल्या प्लेयरची टेस्ट मॅचमध्ये कमाल

लागोपाठ विकेट काढून मॅचमध्ये बनला हिरो

Mumbai Indians ने 17.50 कोटीला विकत घेतलेल्या प्लेयरची टेस्ट मॅचमध्ये  कमाल
Aus vs Sa Test
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Dec 26, 2022 | 1:28 PM

मुंबई: नुकतच IPL ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये एका 23 वर्षीय ऑस्ट्रेलिय ऑलराऊंडरवर पैशांचा पाऊस पडला. त्याला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून आली. या ऑलराऊंडरच नाव आहे, कॅमरुन ग्रीन. शनिवारी त्याच्यावर पैशांचा पाऊस पडला. आज त्याने विकेट घेऊन कमाल केली. त्याला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजी इतके आतुर का होते? ते त्याने आज सिद्ध केलं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून बॉक्सिंग डे टेस्ट मॅच सुरु झाली आहे. IPL ऑक्शननंतरचा कॅमरुन ग्रीनचा हा पहिला सामना होता. कॅमरुन ग्रीनने या मॅचमध्ये लागोपाठ विकेट काढून ऑस्ट्रेलियाच काम सोपं केलं.

फक्त भागीदारीच तोडली नाही, तर….

कॅमरुन ग्रीनच्या गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 200 धावा करता आल्या नाहीत. 189 रन्सवर त्यांचा डाव आटोपला. या टेस्टमध्ये एका भागीदारीने ऑस्ट्रेलियाचा अडचण वाढवली होती. मार्को जॅनसेन आणि कायली वॅरीन दरम्यान चांगली भागीदारी झाली. ग्रीनने फक्त ही भागीदारीच तोडली नाही, तर पुढच्या 3 विकेटही घेतल्या.

आयपीएल इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू

23 वर्षाच्या या ऑलराऊंडर खेळाडूने 10.5 ओव्हर्समध्ये 27 रन्स देऊन 5 विकेट काढल्या. त्याने आपल्या टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांदा 5 विकेट काढल्या. आयपीएल ऑक्शननंतर पहिलाच सामना खेळताना त्याने ही कमाल केली. ग्रीनच्या या कामगिरीने निश्चित ऑस्ट्रेलियाला आनंद झाला असेल. पण मुंबई फ्रेंचायजी सुद्धा तितकीच आनंदात असेल. मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी मोजून त्याला विकत घेतलय. आयपीएलच्या इतिहासातला हा दुसरा महागडा खेळाडू आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भेदक मारा

कॅमरुन ग्रीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या इनिंगच्या दोन सेशनमध्ये गोलंदाजी केली. पहिल्या सत्रात त्याला फक्त 1 विकेट मिळाली होती. पण दुसऱ्या सेशनमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव संपवला.