AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरेरे! याहून खराब गोलंदाजी पाहिली नसेल, 97 ओव्हर टाकल्या, 281 धावा लुटवल्या, तेव्हा जाऊन पहिली विकेट मिळाली

आतापर्यंत क्रिकेट इतिहासांत अनेक गोलंदाज झाले. काहींनी अप्रतिम गोलंदाजीने इतिहास रचला तर काहींची गोलंदाजी इतकी खराब होती की त्यांना एखाद दुसऱ्या मालिकेनंतर कधी संघातही जागा देण्यात आली नाही.

अरेरे! याहून खराब गोलंदाजी पाहिली नसेल, 97 ओव्हर टाकल्या, 281 धावा लुटवल्या, तेव्हा जाऊन पहिली विकेट मिळाली
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 11:38 AM
Share

मुंबई : अनेकदा एक विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजाना बरीच प्रतिक्षा करावी लागते. टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ असला तरी कधी कधी एखाद्या गोलंदाजाला 4 ओव्हरनंतरही विकेट मिळत नाही. तर एकदिवसीय सामन्यातही 10 ओव्हर टाकल्यानंतरही गोलंदाजाला एकही विकेट मिळत नाही. टेस्टमध्ये ही प्रतिक्षा आणखी अधिक असते. पण आज आपण ज्या गोलंदाजाबद्दल बोलतोय त्याला पहिली विकेट मिळवण्यासाठी थोडा-थोडकी नाही तर तब्बल 97 ओव्हर्सची वाट पाहावी लागली होती.

या गोलंदाजाने 584 चेंडू टाकल्यानंतर 281 धावा लुटवल्यावर पहिला विकेट मिळवला. या खेळाडूबद्दल आज बोलण्याचे कारण की, त्याचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 16 जुलैला झाला होता. जॉन वर (John Warr) असं या खेळाडूच नाव असून ते ऑस्‍ट्रेलियाई क्रिकेट (Australia Cricket Team) संघातील खेळाडू होते. त्यांचा जन्‍म 16 जुलै 1927 रोजी झाला होता. ते जॉन मेरिलबोन क्रिकेट क्‍लबचे अध्‍यक्ष ही राहिले होते. तसेच इंग्‍लंड काउंटी चॅम्पियनशिपच्या टीम मिडलसेक्‍सचे कर्णधारपदही भूषवले होते. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघातून ते केवळ दोनच टेस्ट खेळले. ज्यामध्ये त्यांनी केवळ 4 रन बनवले आणि गोलंदाजीचही खास कमाल करु शकले नाही. त्यांनी दोन सामन्यांतील 4 डावांत मिळून केवळ एकच विकेट घेतला. यावेळी त्यांनी 97 ओव्हर म्हणजेच 584 चेंडू टाकले. ज्यानंतर 281 धावा दिल्यानंतर त्याला एकमात्र विकेट मिळाला.

344 सामन्यांत मिळवले 956 विकेट्स

जॉन वर यांनी ऑस्‍ट्रेलिया संघातू दोनच टेस्‍ट मॅच खेळले. ज्यात 5 ते 9 जनवरी 1951 मध्ये इंग्‍लंडविरुद्ध सिडनीमध्ये त्यांनी सलामीचा सामना खेळला होता. त्यानंतर एडिलेड येथे 2 ते 8 फेब्रुवारी 1951 दरम्यान इंग्‍लंडविरुद्धच दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळली होती. आंतरराष्ट्रीय कारकीर्द सोडता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र त्यांनी 344 सामने खेळले. ज्यात तब्बल 956 फलंदाजाना त्यांनी तंबूत धाडलं. यावेळी दोन डावांत 65 धावा देऊन 9 विकेट घेणं हे त्यांच सर्वश्रेष्ठ प्रदर्शन होतं.

संबंधित बातम्या 

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

(Australian Bowler Cricketer MCC President John Warr Birthday on this day Marathi)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली