AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या 170 धावा, ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखणार?

Australia vs India Womens T20 World Cup 2026 Live Score Updates: टीम इंडियाने हा सामना गमावला तर वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप होईल. त्यामुळे भारतासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.

AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या 170 धावा, ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखणार?
India vs Australia Womens T20i World Cup 2026
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 28, 2026 | 8:39 PM

LIVE Cricket Score & Updates

  • 28 Jun 2026 08:39 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : टीम इंडियाच्या 170 धावा, ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखणार?

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 8.55 च्या रनरेटने 171 धावा कराव्या लागणार आहेत. आता भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला 170 धावांआधी रोखणार का? हे पाहणँ महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 08:32 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जेमिमाह रॉडिग्स रिटायर्ड आऊट, ऋचा घोष मैदानात

    टीम इंडियाने जेमिमाह रॉड्रिगसच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. जेमिमाह रॉडिग्स रिटायर्ड आऊट झाली आहे. जेेमिमाहने 28 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. जेमिमाहनंतर ऋचा घोष मैदानात आली आहे.

  • 28 Jun 2026 08:18 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जेमिमाह-हरमनप्रीत जोडी जमली, भारताच्या किती धावा?

    जेमिमाह रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर जोडी जमली आहे. या दोघींनी भारताला 16 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 118 रन्स केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया उर्वरित 4 ओव्हरमध्ये किती धावा जोडण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 07:58 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : अरे काय हे? स्मृती मंधाना रन आऊट, टीम इंडियाला दुसरा झटका

    जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मंधाना यांच्यातील संवादाच्या अभावामुळे भारताला दुसरा झटका लागला आहे. स्मृती मंधाना नॉन स्ट्राईक एन्डवर रन आऊट झाली. स्मृतीने 37 बॉलमध्ये 38 रन्स केल्या.

  • 28 Jun 2026 07:45 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : भारताला पहिला झटका, शफाली वर्मा आऊट

    ऑस्ट्रेलियाला अखेर स्मृती मंधाना-शफाली वर्मा ही सेट सलामी जोडी फोडण्यात यश आलं आहे. ऑस्ट्रेलियाने 10 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर भारताला पहिला झटका दिला आहे. कॅप्टन सोफी मॉलिनिक्स हीने शफालीला बोल्ड केलं. शफालीने 26 बॉलमध्ये 34 रन्स केल्या.

  • 28 Jun 2026 07:38 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : शफाली-स्मृती सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, आता गिअर बदलण्याची गरज

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. या दोघींनी भारताला 8 ओव्हरपर्यंत बिनबाद 54 धावांपर्यंत पोहचवलं आहे. स्मृती 29 आणि शफाली 23 धावांवर नाबाद खेळत आहेत. त्यामुळे आता या दोघींकडून फटकेबाजीची आशा आहे.

  • 28 Jun 2026 07:19 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Score Updates : जबरदस्त, शफाली-स्मृतीची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चाबूक सुरुवात

    शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला अप्रतिम सुुरुवात करुन दिली आहे. या दोघींनी 4  ओव्हरमध्ये 29 रन्स केल्या आहेत. स्मृती 15 आणि शफाली 14 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.

  • 28 Jun 2026 07:04 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, स्मृती-शफाली मैदानात

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वुमन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाकडून शफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मंधाना ही सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 28 Jun 2026 06:54 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन

    ऑस्ट्रेलिया वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : बेथ मूनी (विकेटकीपर), जॉर्जिया वॉल, फोबी लिचफील्ड, एलिस पेरी, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मोलिनक्स (कर्णधार), किम गर्थ आणि लुसी हॅमिल्टन.

  • 28 Jun 2026 06:52 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    वुमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड.
  • 28 Jun 2026 06:41 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियाची निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅटिंग

    टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. भारतीय कर्णघार हरमनप्रीत कौर हीने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टीम इंडिया कांगारुसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 28 Jun 2026 06:38 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : ऑस्ट्रेलिया वुमन्स टीम

    बेथ मुनी (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स (कर्णधार), जॉर्जिया व्हॉल, एलिस पेरी, ऍशलेह गार्डनर, जॉर्जिया वेरहॅम, ॲनाबेल सदरलँड, निकोला केरी, अलाना किंग, किम गर्थ, लुसी हॅमिल्टन, फोबी लिचफिल्ड, मेगन शुट, ग्रेस हॅरिस आणि ताहलिया मॅकग्रा.

  • 28 Jun 2026 06:37 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : वुमन्स टीम इंडिया

    हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर) स्मृती मंधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, भारती फुलमाळी आणि प्रेमा रावत.

  • 28 Jun 2026 06:35 PM (IST)

    AUSW vs INDW Womens T20 WC Live Updates : टीम इंडियासाठी करो या मरो सामना

    टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या साखळी फेरीतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारताचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे.

आयसीसी वुमन्स वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडियासमोर आपल्या मोहिमेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर 4 पैकी 4 सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी एका अर्थाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हा व्हर्च्युअल सेमी फायनलप्रमाणेच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर भारताचा चांगलाच कस लागणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Follow Us