
सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. एकूण 4 गटातून प्रत्येकी 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेतील 27 व्या सामन्यात डी ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने या ग्रुपमधून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उर्वरित 1 जागेसाठी या ग्रुपमध्ये जोरदार चुरस असणार आहे. त्यामुळे बांगलादेश-नेदरलँड्स यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सामना असणार आहे.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना गुरुवारी 13 जून रोजी होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना अर्नोस व्हॅले ग्राउंड, किंग्सटाउन, सेंट व्हिन्सेंट येथे होणार आहे.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर डिज्ने प्लेस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तांझिद हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), तॉहिद ह्रदोय, शकीब अल हसन, जाकेर अली, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.
नेदरलँड्स क्रिकेट टीम : मायकेल लेविट, मॅक्स ओडॉड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकेरेन, व्हिव्हियन किंगमा, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, आर्यन दुल्फीकार आणि काइल क्लेन.