BAN vs NZ : बांगलादेशची पहिल्याच टी 20I सामन्यात कमाल, न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा

Bangladesh vs New Zealand 1st T20I Match Result : बांगलादेशने चट्टोग्राममध्ये झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी विजय साकारला. बांगालदेशने या विजयासह मालिका विजयाचा दावा मजबूत केला आहे.

BAN vs NZ : बांगलादेशची पहिल्याच टी 20I सामन्यात कमाल, न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा
Bangladesh Cricket Team
Image Credit source: @BCBtigers X Account
| Updated on: Apr 27, 2026 | 9:25 PM

बांगलादेशने क्रिकेट टीमने न्यूझीलंड विरुद्ध वनडेनंतर टी 20i मालिकेतही विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. बांगलादेशने पहिला एकदिवसीय सामना गमवला. त्यानंतर बांगलादेशने सलग 2 सामने जिंकून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i सीरिजमध्ये तोच झंझावात यशस्वीरित्या कायम राखला.  यजमान बांगलादेशने 27 एप्रिलला 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने पहिला सामना एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केला. बांगलादेशने अशाप्रकारे न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात सलग तिसरा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे. तॉहिद हृदॉय आणि शमीम हौसेन हे दोघे बांगलादेशच्या विजयाचे हिरो ठरले. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड क्रिकेट टीमने बांगलादेशसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 12 बॉलआधी पूर्ण केलं. बांगलादेशने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तसेच बांगलादेशने या विजयासह वनडेनंतर आता टी 20i मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग

बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी एकूण दोघांनी अर्धशतक केलं. तर इतर दोघांनी निर्णायक खेळी केली. कटेन क्लार्क आणि डेन क्लीव्हर या दोघांनी प्रत्येकी 51-51 धावा केल्या. तर कॅप्टन निक केली याने 39 धावांचं योगदान दिलं. तर जोश क्लार्कसन याने नाबाद 27 धावा केल्या. तर बांगलादेशसाठी रिषाद हौसेन याने 2 विकेट्स मिळवल्या.

बांगलादेशची विजयी सुरुवात

बांगलादेशच्या विजयात एकूण 6 फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र तॉहिद हृदॉय आणि शमीम हौसेन या जोडीने बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. तॉहिदने 27 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 51 रन्स केल्या. तर शमीमने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 31 धावा जोडल्या.

तसेच सैफ हसन याने 17, तांझिद हसन तमिम याने 20, कॅप्टन लिटन दास 21 आणि परवेझ हुसेन एमॉन याने 28 धावा केल्या. तर न्यूझीलंडसाठी इश सोढी याने 2 विकेट्स मिळवल्या. तर नॅथन स्मिथ आणि जोश क्लार्कसन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us