AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णालयाचं बिल भरण्यास सासरच्यांचा स्पष्ट नकार, लेकीचा बेवारस मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री भरली धडकी

लेकीचा बेवारस मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री भरली धडकी... सासरच्यांकडून झालेले हाल, रुग्णालयाचं बिल भरण्यास नकार आणि..., आज लेकीचा मृत्यू अभिनेत्री आणि कुटुंबियांना मान्य नाही...

रुग्णालयाचं बिल भरण्यास सासरच्यांचा स्पष्ट नकार, लेकीचा बेवारस मृतदेह पाहिल्यानंतर अभिनेत्री भरली धडकी
Moushumi Chatterjee
| Updated on: Apr 27, 2026 | 10:34 PM
Share

झगमगतं विश्व पाहण्यासाठी फार चांगलं वाटतं. पण सत्य काही वेगळंच असतं. कॅमेऱ्यात सेलिब्रिटींचे फक्त आनंदी चेहरे दिसतात, पण सत्य समोर आल्यानंतर फार मोठा धक्का बसतो. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील असंच काही घडलं आहे. अभिनेत्रीच्या लेकीचे रुग्णालयात उपचार सुरु होते, पण सासरच्यांना बिल देखील भरलं नाही. एवढंच नाही तर, मृत्यूनंतर अभिनेत्रीत्या लेकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत शवगृहात पडला होता. ज्या अभिनेत्रीच्या लेकीने असंख्य यातना सोसल्या ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री मौसमी चटर्जी आहे. मौसमी चटर्जी यांच्या लेकीचं निधन 2019 मध्ये झालं.

मौसमी चटर्जी यांची लेक पायल हिला डायबीटीज होता… धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत्यूपूर्वी पायल दोन वर्ष कोमात होती. एका मुलाखतीत मौसमी चटर्जी यांनी लेकीच्या निधनाचं दुःख व्यक्त केलं. ‘पायल हिच्या वडिलांनी अद्यापही लेकीचं निधन झालं आहे हे मान्य केलेलं नाही.’ जेव्हा जावई डिक्की सिन्हा याने मौसमी चटर्जी यांच्यावर गंभीर आरोप लावले. डिक्की सन्हा म्हणाला, मौसमी चटर्जी यांनी लेकीच्या निधनानंतर तिचं तोंड देखील पाहिलं नाही आणि अंत्यसंस्काराला देखील आले नाहीत. तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.

मौसमी चटर्जी म्हणालेल्या, ‘पायलच्या सासरच्या मंडळींनी कधी आम्हाला आमच्या लेकीला भेटू देखील दिलं नाही. याचा माझ्या लहान मुलीवर वाईट परिणाम झाला. पायलच्या सासरच्या मंडळींनी माझ्या पतीचा देखील अपमान केला.’ सांगायचं झालं तर, मौसमीची मुलगी पायलने व्यावसायिक डिक्की सिन्हाशी लग्न केलं.

मौसमी आणि डिक्कीचे कुटुंब व्यवसायिक भागीदार होते. परंतु व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील संबंध बिघडले. त्या काळात पायल कोमात गेली. त्यानंतर 2018 मध्ये, मौसमीने तिचा जावई डिक्की सिन्हा विरुद्ध पायलची योग्य काळजी घेत नसल्याची तक्रार दाखल केली. यावर डिक्की सिन्हा याने मौसमी विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आणि त्यामध्ये जावयाचा विजय झाला.

डिक्की याने मौसमी यांच्यावर अनेक आरोप केलं. पण सर्व आरोपांना मौसमी यांनी फेटाळलं आणि म्हणाले, ‘मी रुग्णालयात पोहोचली तेव्हा पायलचं निधन झालं होतं. तिला शवगृहात ठेवलं होतं कारण रुग्णालयाचं बिल कोणीच भरलं नव्हतं. या घटनेवरुन कळतं की जगात किती प्रकारचे लोकं राहतात.’

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?