AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम

हिंदू धर्मातच नव्हे तर वास्तुशास्त्रातही झाडांना विशेष महत्त्व दिले जाते. अशातच जर घरातील झाडे वारंवार सुकत असतील, तर ही वास्तुदोषाची समस्या आहे. चला तर मग घरातील सुकलेली रोपं व झाडे कोणते अशुभ संकेत देतात, तसेच कोणत्या दिशेला झाडं लावणे शुभ मानली जातात हे जाणून घेऊयात.

घरातील सुकलेली रोपं देतात अशुभ संकेत, जाणून घ्या योग्य दिशा आणि वास्तुशास्त्राचे नियम
_withered plants
| Edited By: | Updated on: Jun 23, 2026 | 12:15 AM
Share

आपण सर्वजण आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यासोबतच घरातील वातावरण व हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात झाडे आणि रोपं लावतो. हिरवीगार झाडे सुंदर दिसण्यासोबतच सकारात्मक आणि उत्साही वातावरण देखील टिकवून ठेवतात. मात्र कधीकधी योग्य काळजी घेऊनही, घरातील झाडे अचानक सुकू लागतात किंवा कोमेजतात तेव्हा वास्तुशास्त्रानुसार घरातील एखाद्या मोठ्या समस्येचे किंवा वास्तुदोषाचे लक्षण देखील असू शकते. चला तर मग आजच्या लेखात आपण घरातील झाडं आणि रोपं का कोमजतात, त्यासोबतच झाडे ठेवण्याचे योग्य वास्तु नियम काय आहेत ते जाणून घेऊयात.

घरातील कोमजलेली तसेच सुकलेली रोपं देतात ही अशुभ संकेत

वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडं अचानक कोमेजणे किंवा त्यांचे वारंवार सुकणे हे घरातील ऊर्जेच्या असंतुलनाचे लक्षण असू शकते. असे मानले जाते की, जेव्हा एखाद्या जागेतील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते, तेव्हा त्याचे परिणाम तेथील झाडांवर दिसू लागतात. त्यामुळे आर्थिक समस्या, मानसिक ताण किंवा कुटुंबातील वाढत्या नकारात्मकतेचे लक्षण देखील मानतात. मात्र कधीकधी पुरेसे पाणी न मिळणे, अपुरा सूर्यप्रकाश किंवा योग्य देखभालीचा अभाव हे देखील यामागे एक प्रमुख कारण असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

आपण घरात कोमजलेली आणि सुकलेली झाडं का ठेवू नयेत?

वास्तुशास्त्रानुसार घरात सुकलेली, कोमेजलेली झाडं ठेवणे अशुभ मानली जातात. घरात जर अशी झाडे असल्यास स्थिरता आणि नकारात्मकतेचे प्रतीक असू शकतात. जर कुंडीतील झाड पूर्णपणे सुकले असेल, तर ते घरात जास्त दिवस ठेवण्याऐवजी काढून टाकून नवीन झाड लावणे अधिक चांगले मानले जाते. यामुळे घराचे वातावरण ताजे आणि सकारात्मकतेने भरलेले राहण्यास मदत होते.

घरात झाडे किंवा रोपं लावण्याची योग्य दिशा

उत्तर आणि पूर्व दिशा

वास्तुशास्त्रानुसार झाडे लावण्यासाठी उत्तर आणि पूर्व दिशा सर्वोत्तम मानल्या जातात. या दिशांमध्ये लावलेली झाडे घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतात, असा विश्वास आहे.

ईशान्य दिशा

ईशान्य कोपरा अत्यंत शुभ मानला जातो. या दिशेत तुळस, मनी प्लांट किंवा इतर लहान हिरवी रोपे लावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते.

तुळशीच्या रोपाला विशेष का मानले जाते?

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्र या दोन्हीमध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की तुळशीचे रोप घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वातावरण शुद्ध करते. जर तुळशीचे रोप वारंवार कोमेजत असेल, तर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे आणि ते ठेवण्याच्या जागेचा विचार केला पाहिजे. तुळशीचे रोप स्वच्छ, भरपूर प्रकाश असलेल्या आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवणे उत्तम.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला