AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचे 86 व्या वर्षी निधन, 4 दशकांपेक्षा जास्त कारकीर्द

Bollywood News : 'नूरी', 'राम बलराम' आणि 'स्वर्ग' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे 86 व्या वर्षी निधन झाले आहे.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्याचे 86 व्या वर्षी निधन, 4 दशकांपेक्षा जास्त कारकीर्द
Bharat KapurImage Credit source: Google
| Updated on: Apr 27, 2026 | 10:36 PM
Share

बॉलिवूडमधून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी वयोमानाशी संबंधित समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अभिनेते अवतार गिल यांनी भरत कपूर यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

अभिनेते अवतार गिल यांनी सांगितले की, भरत कपूर यांच्या मुलाचा मला फोन आला होता. त्याने सांगितले की भरत गेल्या तीन दिवसांपासून अस्वस्थ होते आणि घरीच होते. त्याआधी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निधनानंतर आज सायन रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता 30 एप्रिल रोजी सायन रुग्णालयाजवळील भाऊ दाजी मार्गावरील नॉर्थ बॉम्बे असोसिएशन (पंजाब असोसिएशन) येथे त्यांच्या चौथ्याची विधी पार पडणार आहे. भरत यांच्या अंत्यसंस्काराला राकेश बेदी, दिग्दर्शक रमेश कुमार, अभिनेते कुलदीप सिंग, तसेच IPTA थिएटर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.भरत कपूर कोण आहेत?

भरत कपूर यांची कारकीर्द

भरत कपूर हे बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध चेहरा होते. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपासून चार दशकांहून अधिक काळ त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. या काळात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. 1980 च्या दशकात आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ते कारकीर्दीत अव्वल स्थानी होते. या काळात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर एक कायमस्वरूपी छाप सोडली. ते बहुतेकदा सहाय्यक आणि खलनायकी भूमिका साकारल्या.

भरत कपूर यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये नूरी (1979), राम बलराम (1980), लव्ह स्टोरी (1981), बाजार (1982), गुलाम (1985), आखरी रास्ता (1986), सत्यमेव जयते (1987), स्वर्ग (1990), खुदा गवाह (199), बरसाह (1981), 1990 (1990), (1995), साजन चले ससुराल (1996), आणि मीनाक्षी: ए टेल ऑफ थ्री सिटीज (2004) यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी कॅम्पस, परंपरा, राहत, सांस, अमानत, भाग्यविधाता, तारा, चुनौती आणि कहानी चंद्रकांता की सारख्या टाव्ही सीरियल्स आणि शोमध्ये देखील काम केले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत