
ढाका | बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात झालीय. सामन्याचं आयोजन हे ढाका येथील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना असं काही पाहायला मिळालं जे या आधी टेस्ट क्रिकेटमध्ये कधीच पाहायला मिळालं नाही. बांगलादेशचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन मुशफिकुर रहीम हा Handled the Ball पद्धतीने आऊट झाला. मुशफिकुर कसोटी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने आऊट होणार पहिलाच बांगलादेशी ठरला.
बांगलादेशच्या बॅटिंगमधील 41 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला. मुशफिकुर 35 धावांवर खेळत होता. कायले जेमिन्सन ओव्हर टाकत होता. जेमिन्सनने बॉल टाकला. मुशफिकुरने सावधपणे बॉल मारला. मात्र बॉल मारल्यानंतर मुशफिकुरने बॅटने बॉल अडवण्याऐवजी हाताने अडवला. इतकंच काय तर बॉल स्टंप्सपासून फार दूर होता. मात्र बॉल स्टंप्सला लागेल या भीतीने मुशफिकुरने बॉल बॅटने अडवण्याऐवजी हाताने अडवला आणि घोळ झाला. मुशफिकुरला नियमांनुसार आऊट देण्यात आलं. मुशफिकुर टेस्ट क्रिकेटमध्ये अशाप्रकारे आऊट होणारा एकूण आठवा फलंदाज ठरला.
एमसीसी अर्थात मॅरिलबोन क्रिकेट क्लबने Handled the Ball हा नियम केला आहे. या नियमानुसार फलंदाजाला आऊट दिलं जातं. नियम 33 नुसार, बॉल खेळल्यानंतर एखादा फलंदाजाने जाणीवपू्र्वक हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिस्पर्धी संघाने अपील केल्यास अंपायरला Handled the Ball नियमानुसार आऊट द्यावं लागतं.
कर्मा इज बॅक
Mushfiqur Rahim out for obstructing the field.
– He is the first Bangladesh batter to dismiss by this way in cricket history.pic.twitter.com/MfZONDzswk
— Johns. (@CricCrazyJohns) December 6, 2023
बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शहादत हुसेन, मेहदी हसन मिराझ, नुरुल हसन (विकेटकीपर), नईम हसन, तैजुल इस्लाम आणि शरीफुल इस्लाम.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टिम साउथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, काइल जेमिसन आणि एजाज पटेल.