Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?

New Zealand Squad For Bangladesh Tour 2026 : एकदिवसीय मालिकेला अवघे काही दिवस बाकी असताना न्यूझीलंड क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे. या ऑलराउंडरला दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
NEW ZEALAND vs INDIA
Image Credit source: AFP
| Updated on: Apr 10, 2026 | 11:30 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची रंगत सुरु असताना आता अवघ्या काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 संघांमध्ये एकदिवसीय आणि टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. टी 20i वर्ल्ड कप उपविजेता न्यूझीलंड क्रिकेट टीम बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. येत्या काही महिन्यांनी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी एकदिवसीय मालिका फार महत्त्वाची आहे.

यजमान बांगलादेशचा एकदिवसीय मालिका जिंकून आयसीसी रँकिंगमधील आपलं स्थान सुधारण्याचा प्रयत्न असणार आहे. आयसीसी वनडे रँकिंगमधील अव्वल 8 संघ आगामी वर्ल्ड कप 2027 स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यामुळे बांगलादेशसाठी न्यूझीलंड विरुद्धची ही एकदिवसीय मालिका फार निर्णायक ठरणार आहे.

तसेच दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने काही दिवसांआधीच दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र आता न्यूझीलंडला नाईलाजाने या टीममध्ये बदल करावा लागला आहे. क्रिकेट बोर्डाकडून या संघात 1 बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

न्यूझीलंडला मोठा झटका

बांगलादेश विरूद्धच्या वनडे आणि टी 20I मालिकेआधी न्यूझीलंडला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस्टियन क्लार्क याला दुखापतीमुळे दोन्ही मालिकांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे क्रिकेट बोर्डाने क्लार्कच्या जागी बदली खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे.

क्लार्कला काय झालं?

क्लार्कला श्रीलंका ए टीम विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात कॅच घेताना दुखापत झाली होती, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे क्लार्कला बांगलादेश दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे.

कुणाला संधी?

क्लार्कच्या जागी बांगलादेश दौऱ्यातील वनडे आणि टी 20I मालिकेसाठी बेन लिस्टर याला संधी देण्यात आली आहे. बेनने न्यूझीलंडचं 4 एकदिवसीय आणि 11 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

न्यूझीलंडचा बांगलादेश दौरा

दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात 17 एप्रिल ते 2 मे दरम्यान एकदिवसीय आणि टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात 17, 20 आणि 23 एप्रिलला एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर 27-29 एप्रिल आणि 2 मे रोजी टी 20I सामन्यांचा थरार रंगणार आहे.

Follow Us