Liton das: बांग्लादेशात हिंदू क्रिकेटरवर भडकले कट्टरपंथीय, थेट धर्म परिवर्तनाचा आदेश

| Updated on: Sep 27, 2022 | 4:18 PM

बांग्लादेशच्या टीममधील तो हिंदू क्रिकेटपटू कोण?

Liton das: बांग्लादेशात हिंदू क्रिकेटरवर भडकले कट्टरपंथीय, थेट धर्म परिवर्तनाचा आदेश
Cricketer
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे. सर्वच हिंदू हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. क्रीडा जगतही याला अपवाद नाहीय. भारताप्रमाणे परदेशातही नवरात्रौत्सव साजरा केला जातो. बांग्लादेशात वास्तव्याला असलेले हिंदू तिथे मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा करतात. बांग्लादेशच्या टीममधून लिटन दास हा हिंदू क्रिकेटर खेळतो. त्याने देवीचा फोटो शेयर करताना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धर्म परिवर्तन करण्यास सांगितलं

लिटन दासने चांगल्या भावनेने हे सर्व केलं. पण बांग्लादेशातील कट्टरपंथीय आता त्याला टार्गेट करतायत. हिंदू क्रिकेटपटूने दुर्गा पूजेच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली. कट्टरपंथीय लिटन दासवर भडकले असून त्याला धर्म परिवर्तन करण्यास सांगत आहेत.

सगळ्या धर्माचे लोक

सगळ्यांनीच लिटन दासच्या पोस्टवर वादग्रस्त कमेंटस केलेल्या नाहीत. काही युजर्सनी लिटन दासला दुर्गा पूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात सगळ्या धर्माचे लोक आहेत. कट्टरपंथीयांनी लिटन दासला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.

या पोस्टवर 47 हजारपेक्षा जास्त लाइक्स

लिटन दासने ही पोस्ट फेसबुकवर शेयर केली होती. ‘महालयाच्या शुभेच्छा. आई येतेय’ असं त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. लिटन दासने ही पोस्ट रविवारी शेयर केली होती. तीन दिवसात या पोस्टवर 47 हजारपेक्षा जास्त लाइक्स आले. 6.3 हजार यूजर्सनी कमेंटस केल्या आहेत.

त्यावेळी तर थेट धमकी

कृष्णा जन्माष्टमीच्यावेळी सुद्धा बांग्लादेशात एका हिंदू क्रिकेटपटूला ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तर थेट धमकी देण्यात आली होती. विकेटकीपर फलंदाज लिटन दास आणि ऑलराऊंडर सौम्य सरकार हे बांग्लादेशी टीममधून खेळणारे हिंदू क्रिकेटर्स आहेत.

दोघे बांग्लादेशकडून किती सामने खेळलेत?
लिटन दास बांग्लादेशसाठी 35 कसोटी, 57 वनडे आणि 55 टी 20 सामने खेळले आहेत. सौम्य सरकारने 16 कसोटी, 61 वनडे आणि 66 टी 20 सामने खेळले आहेत.