4 संघ, 61 खेळाडू आणि 6 सामने, दुलीप ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर

Duleep Trophy 2024 Schedule: बीसीसीआयने प्रतिष्ठेच्या अशा दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण 61 खेळाडू सहभागी होणार आहेत. जाणून घ्या.

4 संघ, 61 खेळाडू आणि 6 सामने, दुलीप ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर
duleep trophy
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 15, 2024 | 12:06 AM

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 2024-2025 या वर्षातील देशांतर्गत मोसमातील पहिल्या अर्थात दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.बीसीसीआयने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनसुार, या स्पर्धेत टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी सहभागी होणार आहेत. त्यानुसार 4 पैकी 3 संघात प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर ए टीममध्ये 16 खेळाडूंचा समावेश आहे. या चारही संघांमध्ये एकूण 61 खेळाडू आहेत. ही स्पर्धेचा थरार एकूण 15 दिवस रंगणार आहे. तसेच या स्पर्धेतील 6 सामने एकूण 2 ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार, अनंतरपूर, आंध्रप्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे हे सामने पार पडणार आहेत.

टीम ए: शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा आणि शास्वत रावत.

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेसाठी 4 संघांची घोषणा

टीम बी: अभिमन्यू इशवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेस टेस्ट आवश्यक) , वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, एन जगदीसन (विकेटकीपर), आर साई किशोर आणि मोहित अवस्थी.

टीम सी: ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बाब इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे (विकेटकीपर) आणि संदीप वारियर.

टीम डी: श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.