
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. त्याआधी टीम 2 सराव सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या 2 सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआय निवड समितीने या 2 सराव सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. युवा आयुष बडोनी याच्याकडे इंडिया ए टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तसेच तिलक वर्मा याचंही कमबॅक झालं आहे. तिलकला रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलेलं. तिलकची वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मुख्य संघात निवड करण्यात आली आहे.
सराव सामन्यांना 2 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाला 3 सराव सामने खेळायचे आहेत. मात्र वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आलेला संघ फक्त 1 सामनाच खेळणार आहे. तर उर्वरित 2 सामन्यांसाठी इंडिया ए टीमची घोषणा केली जाईल. त्यानुसार आज 2 फेब्रुवारी रोजी इंडिया ए टीमची घोषणा करण्यात आली आहे.
बीसीसीआय निवड समितीने इंडिया ए टीममध्ये तिलक वर्माशिवाय रियान पराग याचाही समावेश केला आहे. या दोघांना आयपीएल आणि टीम इंडियाकडून खेळण्याचा चांगला अनुभव आहे. भारताचा ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झालीय. त्यामुळे सुंदरच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर रियानला या 2 सराव सामन्यांत चांगली कामगिरी करुन दावा मजबूत करण्याची चांगली संधी आहे.
2 सामने आणि 15 खेळाडू
Presenting India A squad for the warm-up matches ahead of the ICC Men’s T20 World Cup 2026. India A will play two warm-up matches against USA and Namibia.
🙌Note: Tilak Varma will feature in one warm-up match before joining #TeamIndia for the #T20WorldCup pic.twitter.com/LIVpMvI6v6
— BCCI (@BCCI) February 2, 2026
तसेच रियानवर गेल्या महिन्यात दुखापतीनंतर शस्त्रक्रिया झाली होती. तिलक त्यावर मात करुन आता कमबॅकसाठी सज्ज झालाय. तिलकला दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेला मुकावं लागलेलं. मात्र आता तिलक सज्ज झाला आहे. मात्र तिलक पहिल्या सामन्यानंतर भारताच्या मुख्य संघासह जोडला जाणार आहे. तिलक मुख्य संघासह एकूण दुसरा सामना खेळणार आहे.
इंडिया ए विरुद्ध यूएसए, 2 फेब्रुवारी
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 4 फेब्रुवारी,
इंडिया ए विरुद्ध नामिबिया, 6 फेब्रुवारी
वर्ल्ड कप स्पर्धेतील सराव सामन्यांसाठी इंडिया ए टीम : आयुष बडोनी (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन जगदीशन (विकेटकीपर), उर्विल पटेल (विकेटकीपर), मानव सुथार, अशोक शर्मा, गुरजपनीत सिंह, विपरज निगम, खलील अहमद आणि मयंक यादव.